आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीमच्या कर्णधारांना मिळतो एवढा पगार
बीसीसीआय ही फक्त क्रिकेट जगतातलीच नाही तर जगातल्या सगळ्या खेळांमधली सर्वात श्रीमंत संस्था आहे.
मुंबई : बीसीसीआय ही फक्त क्रिकेट जगतातलीच नाही तर जगातल्या सगळ्या खेळांमधली सर्वात श्रीमंत संस्था आहे. बीसीसीआयप्रमाणे सगळ्याच क्रिकेट संस्था काही श्रीमंत नाहीत. यातल्या अनेक क्रिकेट संस्था हा कर्जबाजारीही झालेल्या आहेत. मग या क्रिकेट संस्था त्यांच्या कर्णधारांना किती पगार देतात हा प्रश्न अनेक क्रिकेट रसिकांना पडला असले. सर्कल ऑफ क्रिकेट इंडिया या वेबसाईटनं जगातल्या सगळ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीमच्या कर्णधारांच्या पगाराचं वृत्त दिलं आहे. कर्णधारांना मिळणारा हा पगार त्यांच्या क्रिकेट संस्थांकडून मिळतो. यामध्ये कर्णधारांना जाहिरातीतून आणि वेगवेगळ्या टी-२० लीगमधून मिळणाऱ्या मानधनाचा समावेश करण्यात आलेला नाही.
विराट कोहली
बीसीसीआय ही जगातली सगळ्यात श्रीमंत क्रीडा संस्था असली तरी भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीला मात्र सर्वाधिका पगार मिळत नाही. कोहलीला महिन्याला ५८.३ लाख रुपये पगार मिळतो. कर्णधार म्हणून विराट कोहलीनं ११९ मॅचमध्ये ६८.७९ च्या सरासरीनं ८,२५५ रन केले आहेत. २४३ हा त्याचा सर्वोत्तम स्कोअर आहे. यामध्ये ३३ शतकं आणि २५ अर्धशतकांचा समावेश आहे. विराटच्या नेतृत्वात भारताला ७८ मॅचमध्ये विजय मिळाला तर २९ मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यातली १ मॅच टाय, ९ मॅच ड्रॉ आणि २ मॅचचा निकाल लागला नाही.
फॅप डुप्लेसिस
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅप डुप्लेसिसला महिन्याला २५.१ लाख रुपये पगार मिळतो. कर्णधार म्हणून फॅपनं ८३ मॅचमध्ये ४२.४५च्या सरासरीनं ३,६५१ रन केले आहेत. १३५ नाबाद हा त्याचा सर्वोत्तम स्कोअर आहे. कर्णधार असताना फॅपनं ८ शतकं आणि १७ अर्धशतकं केली आहेत. फॅपच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेला ५७ मॅचमध्ये विजय आणि २६ मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला.
जेसन होल्डर
वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरला महिन्याला १५.४९ लाख रुपये पगार मिळतो. कर्णधार असताना जेसन होल्डरनं ९१ मॅचमध्ये २९.२७ च्या सरासरीनं २४८८ रन केले आहेत. ११० रन हा त्याचा सर्वोत्तम स्कोअर आहे. जेसन होल्डरनं १ शतक आणि १३ अर्धशतकं केली आहेत. कर्णधार म्हणून होल्डरनं ३०.७८ची बॉलिंग सरासरी आणि ३.७८च्या इकोनॉमीनं १५१ विकेटही घेतल्या आहेत. जेसन होल्डरच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजनं २५ मॅच जिंकल्या आणि ५६ मॅच हारल्या. तर २ मॅच टाय, ५ मॅच ड्रॉ आणि ३ मॅचचा निकाल लागला नाही.
टीम पेन
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनला महिन्याला ५७ लाख रुपये पगार मिळतो. कर्णधार म्हणून टीम पेननं ८ मॅचमध्ये १२ च्या सरासरीनं १७६ रन केले आहेत. ६२ रन हा टीम पेनचा कर्णधार असतानाचा सर्वाधिक स्कोअर आहे. टीम पेनच्या नावावर एकच अर्धशतक आहे. टीम पेनच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियानं ७ मॅच गमावल्या तर एक मॅच ड्रॉ झाली. टीम पेनच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाला आत्तापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही.
सरफराज अहमद
पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदला महिन्याला ५ लाख रुपये पगार मिळतो. कर्णधार म्हणून सरफराजनं ७३ मॅचमध्ये २७.७९ च्या सरासरीनं १२२३ रन केले आहेत. यामध्ये ७ अर्धशतकांचा समावेश आहे. ९४ रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. सरफराजच्या नेतृत्वात पाकिस्ताननं ५२ मॅच जिंकल्या आणि १९ मॅच हारल्या. तर १ मॅच ड्रॉ झाली आणि १ मॅचचा निकाल लागला नाही.
केन विलियमसन
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनला महिन्याला २८.५ लाख रुपये पगार दिला जातो. केन विलियमसननं कर्णधार म्हणून १०९ मॅचमध्ये ४४.३४ च्या सरासरीनं ४,८३४ रन केले आहेत. यामध्ये १० शतकं आणि ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. १७६ रन हा विलियमसनचा सर्वाधिक स्कोअर आहे. विलियमसनच्या नेतृत्वात न्यूझीलंडला ५५ मॅचमध्ये विजय मिळाला तर ४७ मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला. ४ मॅच ड्रॉ झाल्या आणि ३ मॅचचा निकाल लागला नाही.
दिनेश चंडीमल
श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडीमलला महिन्याला १८.२ लाख रुपये पगार मिळतो. कर्णधार म्हणून चंडीमलनं ५१ मॅचमध्ये ३४.९च्या सरासरीनं १७८० रन केले आहेत. यामध्ये ३ शतकं आणि ८ अर्धशतकांचा समावेश आहे. १६४ हा चंडीमलचा सर्वाधिक स्कोअर आहे. चंडीमलच्या नेतृत्वात श्रीलंकेचा २३ मॅचमध्ये विजय आणि २३ मॅचमध्ये पराभव झाला. ४ मॅच ड्रॉ आणि एका मॅचचा निकाल लागला नाही.
एंजलो मॅथ्यूज
श्रीलंकेचा कर्णधार एंजलो मॅथ्यूजला महिन्याला १८.२ लाख रुपये पगार मिळतो. कर्णधार म्हणून मॅथ्यूजनं १५३ मॅचमध्ये ४७.५७ च्या सरासरीनं ६,३२७ रन केले आहेत. यामध्ये ७ शतकं आणि ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. १६० हा मॅथ्यूजचा सर्वाधिक स्कोअर आहे. मॅथ्यूजनं कर्णधार असताना ३६.१६ ची सरासरी आणि ३.७च्या इकोनॉमीनं ८३ विकेटही घेतल्या आहेत. मॅथ्यूजच्या नेतृत्वात श्रीलंकेनं ६७ मॅचमध्ये विजय मिळवला आणि ७३ मॅचमध्ये पराभव पत्करला. यातली १ मॅच टाय, ६ मॅच ड्रॉ आणि ६ मॅचचा निकाल लागला नाही.
इओन मॉर्गन
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंड टीमचा कर्णधार सर्वाधिक पगार घेतो. इंग्लंडचा कर्णधार इओन मॉर्गनला महिन्याला ६७.८ लाख रुपये पगार मिळतो. कर्णधार म्हणून मॉर्गननं १२४ मॅचमध्ये ३९.२५ च्या सरासरीनं ४००४ रन केले आहेत. यामध्ये ६ शतकं आणि २७ अर्धशतकांचा समावेश आहे. १२४ हा मॉर्गनचा सर्वाधिक स्कोअर आहे. मॉर्गनच्या नेतृत्वात इंग्लंडनं ७२ मॅच जिंकल्या आणि ४६ मॅच गमावल्या. २ मॅच टाय आणि ४ मॅचचा निकाल लागला नाही.
जो रूट
इअोन मॉर्गनप्रमाणेच इंग्लंडच्या टेस्ट टीमचा कर्णधार जो रूटला महिन्याला ६७.८ लाख रुपये पगार आहे. कर्णधार म्हणून जो रूटनं २४ मॅचमध्ये ४५.५७ च्या सरासरीनं १९९४ रन केले आहेत. यामध्ये ४ शतकं आणि १५ अर्धशतकांचा समावेश आहे. १९० रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. जो रूटच्या नेतृत्वात इंग्लंडला १३ विजय आणि ९ पराभव मिळाले. तर २ मॅच ड्रॉ झाल्या.
मशरफी मुर्तजा
बांगलादेशचा कर्णधार मशरफी मुर्तजाला महिन्याला ३.५ लाख रुपये पगार मिळतो. कर्णधार म्हणून मुर्तजानं ९६ मॅचमध्ये ११.५९ च्या सरासरीनं ६८४ रन केले. ४६ रन हा मुतर्जाचा सर्वाधिक स्कोअर आहे. मुर्तजानं ३३.५९ च्या बॉलिंग सरासरी आणि ५.४२ च्या इकोनॉमीनं १०४ विकेट घेतल्या आहेत. मुर्तजाच्या नेतृत्वात बांगलादेशनं ४९ विजय आणि ४४ पराभव पत्करले. ३ मॅचचा निकाल लागला नाही.
शाकीब अल हसन
बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसनला महिन्याला ३.५ लाख रुपये पगार मिळतो. कर्णधार म्हणून शाकीबनं ७६ मॅचमध्ये ३२.३१ च्या सरासरीनं २५८५ रन केले आहेत. यामध्ये ४ शतकं आणि १५ अर्धशतकांचा समावेश आहे. १०६ रन हा शाकीबचा सर्वाधिक स्कोअर आहे. शाकीबनं २८.४१ च्या सरासरीनं आणि ३.८३ च्या इकोनॉमीनं १३५ विकेटही घेतल्या आहेत. शाकीबच्या नेतृत्वात बांगलादेशचा २८ मॅचमध्ये विजय आणि ४७ मॅचमध्ये पराभव झाला. एका मॅचचा निकाल लागला नाही.
अजगर स्टानीकझाई
अफगाणिस्तानचा कर्णधार अजगर स्टानीकझाईला महिन्याला ५० हजार रुपये पगार आहे. कर्णधार म्हणून स्टानीकझाईनं ९५ मॅचमध्ये २०.९६ च्या सरासरीनं १७४० रन केले आहेत. यामध्ये १ शतक आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. १०१ रन हा स्टानीकझाईचा सर्वाधिक स्कोअर आहे. स्टानीकझाईच्या नेतृत्वात अफगाणिस्तानचा ६३ मॅचमध्ये विजय आणि २९ मॅचमध्ये पराभव झाला. १ मॅच टाय आणि २ मॅचचा निकाल लागला नाही.