विनेश फोगाट एका जाहिरातीसाठी किती घेते? ऑलिम्पिकआधी घेत होती 25 लाख अन् आता...
महिला कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic) पदक जिंकण्यात अयशस्वी ठरल्यानंतरही तिच्या ब्रँड व्हॅल्यूत वाढ झाली आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटात अंतिम फेरीत दाखल होऊनही वजन वाढल्याने महिला कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) पदक जिंकू शकली नाही. अंतिम सामन्याआधी 100 ग्रॅम वजन वाढल्याने विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आलं आणि संपूर्ण भारतीयांमध्ये निराशा पसरली. दरम्यान कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन ऑफ स्पोर्टमधील (Court of Arbitration of Sport) सुनावणीनंतर विनेश फोगाटला रौप्यपदक मिळेल अशी आशा भारतीयांना वाटत होती. पण तिथेही तिच्या हाती निराशा आली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट सुवर्णपदक जिंकली नसली तरी देशवासियांसाठी ती विजेता ठरली आहे.
विनेश फोगाट अधिकृतपणे पदक जिंकू शकलेली नाही. मात्र उपांत्य फेरीत तिने केलेली जबरदस्त कामगिरी भारतीयांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. तिच्या या कामगिरीचा परिणाम तिच्या ब्रँड व्हॅल्यूवरही झाला आहे. इकॉनॉमिक टाइम्समधील रिपोर्टनुसार, विनेश फोगाटने जाहिरातीसाठी घेणाऱ्या मानधनात मोठी वाढ केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकआधी आकारण्यात विनेश फोगाट आकारत होती त्याच्या तुलनेत फीमध्ये वाढ झाली आहे. यासाठी तिची ब्रँड व्हॅल्यू कारणीभूत ठरली आहे.
विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकआधी एका जाहिरातीसाठी 25 लाख रुपये घेत होती. पण आता ती एका जाहिरातीसाठी 75 लाख ते 1 कोटींची मागणी करत आहेत.
नीरज चोप्रा आणि मनु भाकरच्या ब्रँड व्हॅल्यूत वाढ
मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदकं जिंकली, तर रौप्यपदकांसह मायदेशी परतणारा नीरज हा एकमेव खेळाडू ठरला. नीरज चोप्रा पॅरिस गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकण्याच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात अयशस्वी ठरला असला तरी, त्याची ब्रँड व्हॅल्यू 30 ते 40 टक्क्यांनी वाढली आहे, जी 330 कोटी इतकी आहे.
मनुच्या ब्रँड व्हॅल्यूमध्येही वाढ झाली आहे. ThumbsUp सोबत तिने 1.5 कोटींची डील केली आहे. पॅरिस गेम्सपूर्वी, मनु एका जाहिरातीसाठी सुमारे 25 लाख रुपये आकारत होती. ऑलिम्पिकमधील जबरदस्त कामगिरीमुळे यात सहा पटीने वाढ झाली आहे.