Pakistan cricket, World Cup 2023 : वर्ल्ड कपच्या इतिहासात कधी नव्हे ती सुमार कामगिरी पाकिस्तानच्या क्रिकेट संघाने (Pakistan Cricket Team) केली आहे. आतापर्यंत पाकिस्तानी संघ 6 सामने खेळला आहे. त्यातील सुरुवातीचे 2 सामने वगळता पाकिस्तानी संघाला विजय मिळवता आलेला नाही. मागील 4 सामन्यात पाकिस्तानचा सलग पराभव झाल्याने पाईंट्स टेबलमध्ये (World Cup 2023 Points Table) पाकिस्तान 6 व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आता पाकिस्तान सेमीफायनल (Semi final qualification Scenario) गाठण्याच्या आशा धूसर झाल्याचं दिसून येतंय. मात्र, क्रिकेटमध्ये काहीही अशक्य नसतं. पाकिस्तानचा संघ अजूनही सेमीफायनल गाठू शकतो, कसं ते जाणून घेऊया...


पाकिस्तान सेमीफायनल गाठणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानच्या हातात राहिलेत आता 3 सामने. पाकिस्तानचे आगामी सामने बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्याविरुद्ध असणार आहे. तीन सामन्याच्या बळावर पाकिस्तान सेमीफायनलमध्ये (Pakistan Semi final qualification Scenario) पोहचू शकत नाही. त्यामुळे पाकिस्तानला आता चमत्कारच वाचवू शकतो. तो चमत्कार कोणता? तो इतर संघाचा विजय आणि पराजय..


1. पाकिस्तानला आपले उर्वरित तीन सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. त्यामुळे त्यांना आपला नेट रनरेट वाढवता येईल.


2.  बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावाच लागेल.


3. इंग्लंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या तिन्ही संघांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजय मिळवावा लागेल.


4. न्यूझीलंड संघाला श्रीलंकेविरुद्ध जिंकणं आवश्यक आहे. ही कंडिशन पूर्ण होण्याची शक्यता आहे.


5. भारताला नेदरलँडविरुद्धचा सामना जिंकावा लागेल. असं झालं नाही तर भारताबरोबर पाकिस्तानला देखील फटका बसेल.


6. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेला अफगाणिस्तानविरुद्ध आपापले सामने जिंकावे लागतील.


7. भारत किंवा बांगलादेशला श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकावा लागेल. त्यामुळे पाकिस्तानचा संघ अंकतालिकेत वर येऊ शकतो.


दरम्यान, वरील सात समीकरणांपैकी 4 समीकरणं पूर्ण होऊ शकतात. बाकी उर्वरित समीकरणं पाकिस्तानच्या नशिबाचा भाग आहे. पराभवामुळे पकिस्तानमध्ये खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. वर्ल्ड कपमधील (World cup 2023) खराब प्रदर्शनानंतर इंझमाम उल हक यांनी पीसीबीच्या (PCB) मुख्य निवडकर्ता पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता पाकिस्तान उर्वरित सामने कसे खेळणार? यावर सर्वांचं लक्ष असेल.