कपिल राऊत, प्रतिनिधी, झी मीडिया ठाणे : अचानक वाढलेल्या उष्णतेचा परिणाम आता प्रचंड जाणवू लागला आहे. नागरिकांना त्वचा रोगाचा सामना करावा लागत आहे. फंगल इन्फेक्शनसारख्या आजारांच्या रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. दिवसभर घाम आणि त्यातून निर्माण होणारे फंगल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरिया इन्फेक्शन यामुळे अनेक रुग्णांची लाईन डॉक्टरांकडे लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाहेर उन्हात फिरणारे, जिन्स घालणारे आणि मधुमेह असणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. जीन्स रोज धुतली जात नसल्यामुळे नागरिकांना त्वचारोगाचा सामना करावा लागत असल्याचं डॉक्टर सांगत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात जिन्स घालणं टाळण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.


उन्हाळ्यात कोणते त्वचारोग होतात?


१) फंगल इन्फेक्शन


२) बॅक्टेरिया इन्फेक्शन


३) त्वचेवर लाल चट्टे पडणे


४) प्रचंड घामोळ्या येणे 


५) घामोळ्यांप्रमाणे उबाळे अंगावर उठणे


६) सतत खाज येणे


७) त्वचा सुकणे, ड्राय होणे


८) शरिराच्या विशिष्ट भागात रॅशेस उठणे


उन्हाळ्यात काय करु नये?


१) या दिवसात जिन्स घालू नये


२) घट्ट कपडे घालू नये


३) खूप वेळ एकच कपडे घालू नये


४) पायाला घाम न येणारे सॉक्स घाला 


५) ओले कपडे घालू नये 


६) नखे वाढवू नये आणि त्याचा उपयोग खाजवण्यासाठी करू नये


७) स्विमिंग पूल सारख्या ठिकणी आधी ते पाणी शुद्ध आहे का पाहावे नंतरच उतरावे, हीच बाब सर्वच पाण्याच्या ठिकाणी लागू करावी .. 


८) आपला टॉवेल, कपडे या दिवसात कोणाला वापरू देऊ नका किंवा कोणाचे वापरू नका


९) अस्वछ प्राणी म्हणजेच मांजर किंवा श्वान यांच्या पासून दूर राहा


१०) फंगल इन्फेक्शनच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका


११) डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही औषध किंवा त्वचेवर लावणारे क्रीम लावू नये


उन्हाळ्यात काय कराल?


१) सुती किंवा कॉटनचे कपडे घाला


२) आंघोळ केल्यावर आपले शरीर पूर्णपणे सुकवा


३) नखे वाढवू नका


४) मधुमेह असलेल्यांनी सतत डॉक्टरांनाच सल्ला घ्यावा


५) जवळपास २ ते ३ लिटर पाणी रोज प्या


६) नारळ पाणी, लिंबू पाणी, ताक आणि उसाचा रस सतत प्या


७) सन स्क्रीनचा वापर नक्की करा


८) दुसऱ्यांचे कपडे किंवा टॉवेल वापरू नका


९) कामावरून किंवा बाहेरून आल्यावर पुन्हा आंघोळ करा


१०) हार्ड फेस वॉश वापरू नये 


११) बाहेर पडताना टोपी, छत्री, स्क्रॉप व फुल हाताचे कपडे वापरा


१२) गरज असेल तरच दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर पडा 


१३) त्वचा रोगाची लक्षण दिसली की लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या