1908 london Olympics : सध्या पॅरिस ऑलिम्पिकमधून अनेक नवनवीन बातम्या समोर येत आहेत. भारताने आत्तापर्यत ऑलिम्पिकमधून तीन कांस्य पदक नावावर केली आहे. भारतीय खेळाडूंकडून आणखी पदकांची आशा आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर 1908 साली म्हणजेच 115 वर्षी झालेल्या ऑलिम्पिकचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 1908 ची ऑलिम्पिक स्पर्धा 27 एप्रिल ते 31 ऑक्टोबरपर्यंत चालली, ज्यामुळे लंडन ऑलिम्पिक 1908 स्पर्धा इतिहासातील सर्वात लांब ऑलिम्पिक स्पर्धा होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1908 च्या ऑलिम्पिकमध्ये देखील प्रथमच क्रीडापटूंनी उद्घाटन समारंभात त्यांच्या राष्ट्रध्वजाच्या मागे स्टेडियममध्ये परेड केली होती. लंडनमध्ये खेळांचे आयोजन केल्याने आधुनिक ऑलिम्पिक खेळांची परंपरा प्रस्थापित करण्यात आणि भविष्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी मंच तयार करण्यात मदत झाली. तुम्हाला माहिती नसेल तर 1908 सालची ऑलिम्पिक स्पर्धा ही रोममध्ये होणार होती. परंतु 1906 मध्ये माउंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीच्या हिंसक उद्रेकामुळे नेपल्स शहरात बरीच विध्वंस झाली आणि आर्थिक संकट पाहता स्पर्धा लंडनमध्ये आयोजित केली गेली होती.



पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खास स्टेडियम बांधण्यात आले होते. याआधी अशी कोणतीही पद्धत नव्हती. व्हाईट सिटी स्टेडियम खेळांसाठी खास ठरलं. रनिंग ट्रॅक, स्विमिंग पूल, सायकलिंग आणि कुस्तीचे आखाडे देखील तयार करण्यात आले होते. याशिवाय लाकडाचा जिम्नॅस्टिक स्टेज देखील उभा करण्यात आला होता. प्रेक्षकांनी देखील याचा दाद दिली अन् 66 प्रेक्षक संपूर्ण स्पर्धेला उपस्थित राहिले होते. या स्पर्धेत डायव्हिंगसाठी खास फोल्डिंग 'टॉवर'ही बांधण्यात आला होता.


दरम्यान, जॉन टेलर हा पहिला कृष्णवर्णीय ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता ठरला. तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी 'आस्ट्रालासिया' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं.