Mumbai Indians: नुकतंच मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेत रोहित शर्माला बाजूला सारून हार्दिक पंड्याला कर्णधारपद दिलंय. आयपीएल 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. त्याआधीच हार्दिक पांड्याकडे कमान सोपवण्यात आल्याने मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये नाराजी दिसून आली. आता आयपीएल 2024 मध्ये या टीमचं कर्णधारपद हार्दिकच्या हातात असताना रोहित शर्मा त्याच्या हाताखाली खेळताना दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच आता मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 कशी असणार आहे, याची उत्सुकता सर्वांच्या मनात आहे. आयपीएल 2024 साठी झालेल्या लिलावात मुंबईच्या टीमने 8 खेळाडूंना खरेदी केलंय. यामध्ये सर्वात महागडा जेराल्ड कोएत्झी हा खेळाडू ठरला. मुंबईच्या टीमने त्याला 5 कोटी रुपयांना विकत घेतलं. याशिवाय यावेळी मुंबईने दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, मोहम्मद नबी या खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेतलं आहे.


हार्दिकच्या नेतृत्वाखाली कशी असेल मुंबईची प्लेईंग 11


हार्दिक पांड्या या सिझनपूर्वीही मुंबईच्या टीमचा भाग होता. परंतु यावेळी तो या टीममध्ये कर्णधार म्हणून परतला आहे. यापूर्वी तो रोहित शर्माच्या आणि त्याच्या नेतृत्वाखाली या टीमचा सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन कसं असणार आहे, यावर एक नजर टाकूया. 


आगामी सिझनमध्ये माजी कर्णधार रोहित शर्मासह इशान किशन मुंबईसाठी ओपनिंग करताना दिसतील. तर सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरणार आहे. यानंतर चौथ्या क्रमांकासाठी तिलक वर्माला टीममध्ये संधी मिळणार आहे. तर टीम डेव्हिड पाचव्या स्थानावर असणार आहे.


याशिवाय कर्णधार हार्दिक पंड्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणार आहे. यानंतर सातव्या क्रमांकावर रोमॅरियो शेफर्ड टीममध्ये संधी मिळणार आहे. गोलंदाजीमध्ये गेराल्ड कोएत्झी व्यतिरिक्त जसप्रीत बुमराह, श्रेयस गोपाल आणि पियुष चावला यांना टीममध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.


आयपीएल 2024 साठी मुंबईची संभाव्य प्लेईंग 11


रोहित शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेविड, हार्दिक पंड्या (कर्णधार), रोमारियो शेफर्ड, गेराल्ड कोएट्जी, जसप्रित बुमराह, श्रेयस गोपाल, पियूष चावला


मुंबई इंडियन्सची संपूर्ण टीम


विकेटकीपर: इशान किशन, विष्णु विनोद


फलंदाज: रोहित शर्मा, टिम डेविड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, डेवाल्ड ब्रेविस


ऑलराऊंडर: हार्दिक पंड्या, रोमारियो शेफर्ड, नेहल वढेरा, शम्स मुलानी, गेराल्ड कोएत्जी, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, नमन धीर


गोलंदाज: जसप्रीत बुमराह, जेसन बेहरेनडोर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, पियूष चावला, दिलशान मदुशंका, नुवान तुषारा, अंशुल कंबोज, श्रेयस गोपाल