रितिका सचदेहची मैदानातील ही रिअॅक्शन तुफान व्हायरल, नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ
मैदानात असं काय घडलं ज्यामुळे रितिकाला एक सेकंदा मोठा धक्का बसला पण... पाहा व्हिडीओ
दुबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड टी 20 वर्ल्ड कपसाठी सामना सुरू आहे. न्यूझीलंड संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाची फलंदाजी विशेष चांगली राहिली नाही. ईशान किशन आणि के एल राहुल आऊट झाला. रोहित शर्मा मैदानात उतरल्यानंतर रितिका सचदेहची रिअॅक्शन पाहण्यासारखी होती.
रितिका सचदेहने दिलेल्या रिअॅक्शनमुळे आता ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा बॅटिंगसाठी उतरला. त्यावेळी त्याची सुरुवात चांगली झाली नाही. तो पुल शॉट खेळण्याच्या तयारीत होता. त्याच वेळा त्याने टोलवलेला बॉल अॅडम मिल्ने कॅच पकडता पकडता सुटला. रोहित शर्मा कॅच आऊट होता होता वाचला.
हा प्रसंग स्टेडियमच्या बाल्कनित बसलेली रितिका पाहात होती. रोहित कॅच आऊट होतो की काय याची धाकधूक तिला होती. कॅच सुटल्यानंतर मात्र रितिकाच्या आणि चाहत्यांच्या जीवात जीव आला. तिने दिलेली रिअॅक्शन सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. रोहित शर्मा अवघ्या 14 धावा करून आऊट झाला.
टीम इंडियाने न्यूझीलंड संघाला 111 धावांचं आव्हान ठेवलं आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजांना रोखण्याचं आव्हान बॉलर्ससमोर आहे. आता भिस्त गोलंदाजांच्या हाती आहे. न्यूझीलंडच्या धडाकेबाज फलंदाजांना तंबुत धाडण्यासाठी ते कसा प्लॅन तयार करतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. हा सामना जिंकणं टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे.