Babar Azam: मला फार वाईट...; सलग तिसऱ्या पराभवानंतर हताश झाला बाबर आझम
Babar Azam : अफगाणिस्तानने या स्पर्धेत दुसरा विजय मिळवला आहे. दरम्यान या पराभवानंतर पाकिस्तान टीमचा कर्णधार बाबर आझम संतापला होता.
Babar Azam : यंदाच्या वर्ल्डकपमध्ये मोठे उलटफेर पहायला मिळतायत. सोमवारी झालेल्या सामन्यात देखील अशीच परिस्थितीत दिसून आली. या सामन्यात अफगाणिस्तानच्या टीमने पाकिस्तानचा पराभव केलाय. या विजयामुळे अफगाणिस्तानने या स्पर्धेत दुसरा विजय मिळवला आहे. दरम्यान या पराभवानंतर पाकिस्तान टीमचा कर्णधार बाबर आझम संतापला होता.
काय म्हणाला बाबर आझम?
अफगाणिस्तानकडून पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर बाबर आझमने पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये सांगितलं की, या पराभवामुळे मी खूप निराश झालोय. मात्र त्याला फलंदाजांवर कोणत्याही प्रकारचे दडपण आणायचे नाही.
या पराभवामुळे आम्हाला वाईट वाटलंय. आमचा एकूण स्कोर चांगला होता. मधल्या ओव्हर्समध्ये विकेट्स काढता न आल्याने आम्हाला गोलंदाजीत चांगली कामगिरी करता आली नाही. जर तुम्ही एका डिपार्टमेंटमध्ये चांगले नसाल तर तुम्ही गेम गमावाल. आम्ही फोर रोखले नाही आणि रन्स दिले, ज्याचा परिणाम आम्हाला भोगावा लागला.
गोलंदाजांवर फोडलं पराभवाचं खापर
बाबर आझम पुढे म्हणाला की, गोलंदाजीमध्ये आम्ही चांगली सुरुवात केली, मधल्या ओव्हर्समध्ये आम्हाला विकेट्सची गरज होती पण आम्ही एकही विकेट घेऊ शकलो नाही. अफगाणिस्तानच्या टीमने तिन्ही विभागात ज्या प्रकारे खेळ केला. त्याचं संपूर्ण श्रेय अफगाणिस्तानला जाते. आम्ही गोलंदाजी आणि फिल्डींग योग्य केली नाही. पुढच्या सामन्यात आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करू."
अफगाणिस्ताने तगड्या पाकिस्तानला 8 विकेट्सने पराभवाची धुळ चारली. पाकिस्तानने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 50 ओव्हर्समध्ये 7 गडी गमवून 282 रन्स केले. यावेळी अफगाणिस्तानला विजयासाठी 283 रन्सचं आव्हान दिलं. हे आव्हान अफगाणिस्तानने 8 विकेट्स आणि 6 बॉल्स राखून पूर्ण केलं. दरम्यान या पराभवासह पाकिस्तानच्या टीमसाठी सेमीफायनल गाठणं अजून कठीण झालं आहे.