`मी धोनी किंवा ख्रिस गेल नाही, टायिमंगवर फोकस करतो`
. श्रीलंकेविरुद्धचे त्याचे हे दुसरे शतक आहे. रोहितने १५३ धावांत नाबाद २०८ धावा चोपल्या.
नवी दिल्ली : श्रीलंकेविरूद्ध 'हिट मॅन' रोहित शर्माने नाबाद २०८ धावांची खेळी करत क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केला. तिसरे द्विशतक ठोकणारा रोहित पहिला फलंदाज ठरलाय.
. श्रीलंकेविरुद्धचे त्याचे हे दुसरे शतक आहे. रोहितने १५३ धावांत नाबाद २०८ धावा चोपल्या.
सर्वाधिक स्कोअर
रोहितचा वनडेतील सर्वाधिक स्कोर २६४ आहे. श्रीलंकेविरुद्ध २०१४मध्ये त्याने ही धावसंख्या उभारली होती.
याशिवाय २०१३मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलकातामध्ये २०९ धावा ठोकल्या होत्या.
कुठली रेटींग ?
मॅच नंतर भारतीय क्रिकेट कोच रवि शास्त्री यांनी रोहितला विचारले, "तीन डबल सेंच्युरीमध्ये या डबल सेंच्युरीला कुठली रेटींग देशील ?"
"कोणती एक चांगली सांगण माझ्यासाठी कठीण असेल. तिघांचेही महत्त्व माझ्यासाठी खास आहे. कठीण वेळात मी डबल सेंच्युरी मारली आहे." असे उत्तर रोहितने दिले.
टायमिंगवर विश्वास
"देशातील सर्वात मोठ्या मैदानापैकी हे एक आहे, जिथे प्रत्येक कोपऱ्यात तू शॉट मारलास ?" असा प्रश्न रवी शास्त्रींनी विचारला.
"याचे श्रेय टीम इंडियाचे ट्रेनर शंकर बासु यांना जाते, ते आमच्यासोबत खूप मेहनत घेत आहेत. बॉलला वेळ देऊन खेळण ही माझी ताकद आहे.मी त्यावरच फोकस केल.
मला माहितेय मी एम.एस.धोनी किंवा ख्रिस गेल नाही की माझ्याकडे एवढी पॉवर असेल.
पण मी टायमिंगवर विश्वास ठेवतो, जो या मॅचमध्ये ठेवला",असे उत्तर रोहितने दिले.
८९ सामन्यांत ४४५० धावा
रोहित शर्माने सलामीवीर म्हणून ८९ सामन्यांमध्ये ५६.३२ च्या सरासरीने ४४५० धावा केल्यात. यात १४ शतके आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे.
सलामीवीर होण्याआधी रोहितच्या नावावर ८६ सामन्यांत केवळ दोन शतके आणि १२ अर्धशतके होती. त्याचा सर्वाधिक स्कोर ११४ इतका होता.
सलामीवीर म्हणून भूमिका बजावताना रोहितचा सर्वाधिक स्कोर २६४ इतका होता. २०१४मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने ही खेळी केली होती. रोहितने २३ जानेवारी २०१३नंतर ८६ सामन्यांत सलामीची भूमिका बजावली.
यात त्याने ५७.४२ च्या सरासरीने ४४२१ धावा केल्या. या दरम्यान केवळ एकदाच अफगाणिस्तानविरुद्ध २०१४मध्ये ढाकामध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यास उतरला होता.
यात त्याने १८ धावा केल्या होत्या.