मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली लवकरच एक मोठा ऐतिहासिक पल्ला गाठणार आहे. आज विराट त्याचा 100 वा टेस्ट सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. श्रीलंकेविरूद्ध मोहालीमध्ये पहिल्या टेस्ट सामन्याला आता सुरुवात होणार आहे. दरम्यान सामन्यापूर्वी विराट कोहलीने, मला विश्वास नव्हता की मी 100 टेस्ट खेळू शकेन, असं विधान केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडून सोशल मीडियावर एक व्हिडीयो जाहीर करण्यात आला आहे. या व्हिडीयोमध्ये विराट म्हणतो, खरं सांगायचं तर मी कधी विचार केला नव्हता की, मी 100 टेस्ट सामने खेळू शकेन. हा खूप लांबचा प्रवास होता.



इथवर पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत


मी स्वतःला भाग्यशाली समजतो की मला 100 टेस्ट सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यावेळी मी अधिक इंटरनॅशनल सामने खेळलेत. इथपर्यंच पोहोचण्यासाठी मला खूप मेहनत घेतली आहे. माझ्याप्रमाणे हा माझ्या कुटुंबासाठी देखील एक मोठी संधी आहे. माझ्या कोचसाठीही ही मोठी गोष्ट असून मी त्यांच्याकडून खूप काही शिकलोय, असं कोहली म्हणाला.


कोहली म्हणतो, "मी आतापर्यंत खूर रन्स केले. मी मोठी खेळी खेळू असाच माझा मनात विचार असतो. मी फलंदाजी करत असताना नेहमी त्याचा आनंद घेतो. याचसोबत टीमला जिंकवून देण्याचाच नेहमी माझा प्रयत्न असतो. टेस्टचा अनुभव खूप महत्त्वाचा असतो."