T20 World Cup Semi-Final: टी-20 वर्ल्डकप आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय. 10 नोव्हेंबर म्हणजेच उद्या भारत विरूद्ध इंग्लंडचा सामना रंगणार आहे. एडिलेडच्या मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. अशातच सेमीफायनलच्या पूर्वसंध्येला कर्णधार रोहित शर्माने प्रेस कॉन्फरन्स घेतली. यामध्ये रोहितने अक्षर पटेल आणि सूर्यकुमार यादवसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.


Axar Patel विषयी रोहित म्हणाला...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये बोलताना रोहित शर्मा म्हणाला, "खरं सांगायचं तर अक्षर पटेलबाबत मी चिंतेत नाहीये त्यामुळे मला फरक पडत नाही. त्याने अजून जास्त ओव्हर फेकले नाहीयेत. एखाद्या खराब टूर्नामेंटचा अर्थ असा नाही की, गोलंदाज चांगली गोलंदाजी करत नाही. पॉवर-प्लेमध्ये त्याची ताकद चांगली गोलंदाजी अशीच आहे."


चांगल्या फॉर्ममध्ये सूर्यकुमार


टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ने आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून तो उत्तम फॉर्ममध्ये आहे. Sky is the limit for him... असं म्हणत रोहितनं सूर्यकुमार यादवच्या खेळीवर उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली. सूर्याविषयी रोहित म्हणाला, "सूर्याने त्याची जबाबदारी समजून घेतली आहे. त्याच्यासोबत इतर खेळाडूंना खेळणंही सहज होतं. त्याला मोछ्या मैदानांमध्ये खेळणं पसंत आहे."


स्वत:च्या फिटनेसबाबत काय म्हणतोय रोहित? 


मंगळवारी रोहितच्या हाताच्या मनगटाला दुखापत (Rohi sharma injury) झाल्याची माहिती समोर आली आणि क्रिकेट जगतात चिंतेची लाट पसरली. आपल्या याच दुखापतीबाबतही तो स्पष्टच बोलला. 'हो मला काल दुखापत झाली होती, पण आता मी उत्तम आहे. काल लहानशी जखम होती पण आता ती पूर्णपणे बरी आहे', असं सांगत आपण सामन्यासाठी तयार असल्याचे संकेत त्यानं दिले. 


पंत की कार्तिक, Semi Final मध्ये कोणाची वर्णी? 


आपला संघ उपांत्य फेरीत जाईल, किंवा तिथे कोणत्या संघाच्या विरोधात आपल्याला खेळायचं आहे याची काहीच कल्पना नसल्याचं रोहितनं सांगत ऋषभ पंतच्या विषयाला हात घातला. पंतनं सराव सामन्याव्यिरिक्त कोणत्याही सामन्यात सहभाग घेतलेला नाही. त्याला थेट Semi Final मध्ये खेळवणं योग्य नसेल. पुढच्या सामन्यासाठी दोन्ही Wicket Keepars (Rishabh Pant Dinesh Kartik) उपलब्ध आहेत. त्यामुळं कोण खेळेल यावरून गुरुवारीच पडदा उचलण्यात येणार आहे.