लंडन : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज भारताचा मुकाबला श्रीलंकेशी होतोय. या सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय संघ उपांत्यफेरीत पोहोचेल. त्यामुळेच या सामन्यात आक्रमकतेने खेळण्याचे संघाला आवाहन केलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने पहिल्या सामन्यात १२४ सामन्यात दमदार विजय मिळवला होता. मात्र या विजयाने संतुष्ट होण्याचे कारण नाही. आयसीसींच्या स्पर्धांमध्ये श्रीलंकेची कामगिरी चांगली राहिलेली आहे. गेल्या काही वर्षातील त्यांचे रेकॉर्ड पाहिले असता ते नेहमीच किमान सेमीफायनलपर्यंत पोहोचलेत. त्यांच्याकडे प्रतिभावान फलंदाज असून युवा संघ आहे. त्यामुळे आपल्याला आक्रमकतेने खेळण्याची गरज आहे, असं विराट म्हणाला.


पहिल्या सामन्यात अखेरच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करणाऱ्या हार्दिक पांड्याचे यावेळी विराटने कौतुक केले. हार्दिक भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाचा आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर त्याची कामगिरी महत्त्वाची राहिलीये. दोन्ही गुण एकाच खेळाडूमध्ये मिळणं कठीण आहे, असंही पुढे विराटने स्पष्ट केले.