Virat Kohli: मी रोहितला असं कधीही पाहिलं नव्हतं...; कर्णधारासंदर्भात विराटचा धक्कादायक खुलासा
Virat Kohli: विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केलीये. दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात विराट कोहलीने गोलंदाजांची धुलाई केली. मात्र यानंतर विराटने रोहित शर्मा (Rohit Sharma) संदर्भात मोठा खुलासा केला आहे.
Virat Kohli: नुकंतच टीम इंडियाचा स्टार विराट कोहलीने 49 वी सेंच्युर झळकावली. ईडन गार्डन्सच्या मैदानावर विराटने सेंच्युरी झळकावली. यावेळी विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केलीये. दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात विराट कोहलीने गोलंदाजांची धुलाई केली. मात्र यानंतर विराटने रोहित शर्मा (Rohit Sharma) संदर्भात मोठा खुलासा केला आहे.
विराट कोहलीने स्टार स्पोर्ट्सला सांगितलं की, 'मला नेहमी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवायला आवडतं. हा माझ्या खेळाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळेच मी सामन्यापूर्वी त्याबद्दल जागरुक राहतो.'' मेलबर्नमध्ये 2022 च्या T20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताच्या पाकिस्तानवर विजयानंतर शांत असलेल्या रोहित शर्माने ज्या पद्धतीने आनंद साजरा केला तेव्हा विराट भारावून गेला.
विराटने Rohit Sharma संदर्भात केला खुलासा
पाकिस्तानच्या सामन्याचा संदर्भ देत विराट कोहली म्हणाला, 'मी रोहितसोबत तब्बल 15 वर्षांपासून खेळतोय. पण त्याला असं सेलिब्रेट करताना मी कधीच पाहिलं नाही.'
विराट कोहलीने त्या मॅचमध्ये 53 बॉल्समध्ये नाबाद 82 रन्सची खेळी आणि भारताला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर त्याने शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रौफ यांसारख्या गोलंदाजांचा सामना केला.
विराट म्हणाला, 'त्यांचा सामना करण्यासाठी कोणतीही विशेष तयारी करण्यात आली नाही. कारण गेल्या काही वर्षांत तुम्हाला 140, 145 आणि 150 किमीच्या वेगाने टाकलेल्या बॉल्सचा सामना करण्याची सवय होती. फक्त आव्हानाचा सामना करण्यासाठी तुम्हाला मानसिकदृष्ट्या तयार असायला हवं.
विराटच्या या खेळीनंतर रोहित शर्मा खूप खुश दिसत होता. सामना जिंकल्यानंतर रोहितने मैदानावर येत कोहलीला उचलून घेतलं होतं. हा फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता.
सचिनने अभिनंदन केल्यानंतर भावूक झाला Virat Kohli
सचिन तेंडुलकरने विराटच्या 49व्या शतकाबद्दल त्याचं अभिनंदन केलं. यावेळी विराट भावूक झाला. विराट म्हणाला की, हिरोच्या विक्रमाची बरोबरी करणं हा मोठा सन्मान आहे आणि हा भावनिक क्षण आहे. सध्या वर्ल्डकपमध्ये विराटने आठ सामन्यांमध्ये 108.60 च्या सरासरीने फलंदाजी करत 543 रन्स केले आहेत. ज्यामध्ये चार अर्धशतकं आणि दोन शतकांचा समावेश आहे.