SRH vs LSG: आयपीएलमध्ये बुधवारी लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात हैदराबादच्या टीमने लखनऊचा धुव्वा उडवला. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या तुफान खेळीच्या जोरावर हैदराबादने विजय मिळवला. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा 10 विकेट्स राखून पराभव केला. विजयासाठीचे 166 रन्सचं लक्ष्य सनरायझर्सने 9.4 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. हेडने 30 बॉल्समध्ये आठ चौकार आणि आठ षटकारांसह नाबाद 89 रन्स केले. तर शर्माने 28 बॉल्समध्ये नाबाद 75 रन्स केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विजयासह सनरायझर्स 12 सामन्यांत 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. लखनऊ 12 सामन्यांतून 12 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. यासह पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स 12 सामन्यांत आठ गुणांसह प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. पॉवरप्लेमध्ये हेड आणि शर्मा यांनी 107 रन्स केले. या लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार केएल राहुलने मोठं विधान केलं आहे.


काय म्हणाला के.एल राहुल?


10 विकेटने सामना गमावल्यानंतर केएल राहुल म्हणाला, 'माझ्याकडे बोलण्यासाठी काही शब्दच नाहीत. आमच्याकडे T.V. वर अशी फलंदाजी पाहिली आहे. पण ही अविश्वसनीय फलंदाजी होती. प्रत्येक बॉल बॅटच्या मध्यभागी लागत होता. दुसऱ्या डावात पिच कसं आहे हे जाणून घेण्याची संधी त्यांनी दिली नाही. त्यांना रोखणं अवघड होतं कारण पहिल्याच बॉलपासून मोठे फटके मारायला सुरुवात केली. 


राहुल पुढे म्हणाला, आम्ही 40-50 रन्स कमी करू शकलो. पॉवरप्लेमध्ये विकेट्स गमावल्यानंतर आम्हाला गती पकडता आला नाही.  आम्ही 240 धावा केल्या असत्या तरी कदाचित त्यांनी पाठलाग केला असता.


या विजयासह हैदराबाद आता 12 सामन्यांत 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचलं आहे. लखनऊ 12 सामन्यांत 12 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. आता त्यांना प्लेऑफसाठी पात्र ठरणं कठीण दिसतंय. दरम्यान हैदराबादने लखनऊचा पराभव केल्यामुळे आता मुंबई इंडियन्स आयपीएलच्या यंदाच्या हंगामामधून बाहेर पडणारी पहिली टीम ठरली आहे. मुंबई इंडियन्सच्या खात्यात आता 8 गुण आहेत. तर त्यांना अजून दोन सामने खेळायचे आहेत. मुंबई कितीही जोर लावला तरी मुंबईकडे 12 च गुण होतील. मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या आयपीएलमधून बाहेर पडला आहे.