Mitchell Santner: सध्या पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई सुपर किंग्जची टीम चौथ्या क्रमांकावर आहे. ऋतुराज गायकवाडची टीम प्लेऑफ गाठणार अशी आशा व्यक्त केली जातेय. अशातच चेन्नईचा ऑलराऊंडर आणि न्यूझीलंडच्या टीमचा खेळाडू मिचेल सँटनर याने मोठं वक्तव्य केलं आहे. यंदाच्या आयपीएलच्या सिझनमध्ये मिचेलला केवळ एकच सामना खेळण्याची संधी दिली आहे. मात्र असं असूनही तो निराश होणार नाहीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिझनमध्ये सँटनरला आतापर्यंत फक्त एकच सामना खेळायचा मिळाला असून तो निराश झालेला नाही. सँटनरच्या म्हणण्याप्रमाणे, या सिझनमध्ये केवळ दोन सामने खेळायला मिळाले तरी तो निराश होणार नाही, कारण टीम संयोजनामुळे असं घडतं. यावेळी टीमला यश मिळाल्यावर आनंद होते. मिचेल सँटनर गेल्या काही सिझनमध्ये चेन्नईच्या टीमसोबत आहे. परंतु आयपीएल 2024 मध्ये त्याला सलग 11 व्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती.


मिचेल सँटनरने CSK च्या सोशल मीडिया टीमला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "मला जरी दोन सामने खेळायला मिळाले तरी मी त्या दोन सामन्यांमध्ये माझे सर्वोत्तम प्रदर्शन नक्की करेन. जर मला जास्त सामने खेळायला मिळाले तर उत्तमचं आहे, नाही तर मी टीमसाठी आनंदी आहे." 


टीमचं नियोजन करताना कधी-कधी चांगले खेळाडूही प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळू शकत नाहीत. आयपीएलमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये केवळ चार परदेशी खेळाडू खेळतात, असंही सँटनरने म्हटलंय.


पंजाबविरूद्ध मैदानात उतरला होता सँटनर


न्यूझीलंडच्या टीमचा मिचेल सँटनर चेन्नई सुपर किंग्जकडून धर्मशाला मैदानावर पंजाब किंग्जविरुद्ध खेळण्यासाठी आला होता. यावेळी फलंदाजी करताना त्याने 11 रन्स केले आणि एक विकेटही घेतली. मिचेल सँटनरने गोलंदाजीची सुरुवात केली आणि तीन ओव्हरमध्ये त्याने केवळ 11 धावा दिले आणि विकेटही मिळवली. पहिल्याच सामन्यात त्याने स्वत:ला सिद्ध केलं.