Rohit Sharma: टीमचा भाग नसल्याने मी निराश...; वर्ल्डकप फायनल तोंडावर असताना रोहित शर्माचं ट्विट व्हायरल
Rohit Sharma: आता सर्व चाहत्यांना 19 तारखेला रंगणाऱ्या फायनलची उत्सुकता आहे. 12 वर्षांनी टीम इंडियाने पुन्हा वर्ल्डकप जिंकावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. मात्र फायनलच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचं एक ट्विट व्हायरल झालं आहे.
Rohit Sharma: येत्या 19 नोव्हेंबर म्हणजेच रविवारी वनडे वर्ल्डकपचा फायनल सामना रंगणार आहे. टीम इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ही शेवटची आणि रोमांचक लढत होणार आहे. बुधवारी पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 70 रन्सने पराभव केला. तर दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 3 विकेट्सने विजय मिळवला आहे.
आता सर्व चाहत्यांना 19 तारखेला रंगणाऱ्या फायनलची उत्सुकता आहे. 12 वर्षांनी टीम इंडियाने पुन्हा वर्ल्डकप जिंकावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. मात्र फायनलच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचं एक ट्विट व्हायरल झालं आहे.
रोहित शर्माचं 12 वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल
भारताच्या फायनलमध्ये एन्ट्री करण्याच्या जल्लोषात रोहित शर्माची 12 वर्ष जुनी एक्स पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हायरल होतेय. गेल्या 12 वर्षांपूर्वी भारतात वर्ल्डकप खेळवण्यात आला होता. त्यावेळी वर्ल्डकपच्या टीममध्ये रोहित शर्माची निवड करण्यात आली नव्हती. वर्ल्डकपमध्ये सहभागी होता न आल्याने तो निराशा व्यक्त करत होता.
त्यावेळी रोहित शर्माने सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'वर्ल्डकपच्या टीमचा भाग नसल्यामुळे मी खरोखर निराश झालो. मात्र मला इथून पुढे जाण्याची गरज आहे. पण खरं सांगायचं तर, हा एक मोठा धक्का होता.'
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार फायनलचा सामना
2003 साली सौरव गांगुली टीम इंडियाचा कर्णधार होता. त्यावेळी देखील टीम इंडिया वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करला होता. या वर्ल्डकपमध्ये महान फलंदाज सचिन तेंडुलकरने सर्वाधिक 673 रन्स केले होते. त्यावेळी फायनलच्या पराभवाने सचिन तेंडुलकरसह भारतातील तमाम क्रिकेट चाहत्यांना हळवे झाले होते. पण आता त्याच पराभवाचा बदला घेण्याची सुवर्ण संधी भारताकडे आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे टीम 20 वर्षांनंतर वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत.