लंडन :  भारताचा कर्णधार विराट कोहलीनं २०१२ सालच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी टेस्टमधल्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यावेळी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात कोहली खेळत होता. बाळाचे पाय जसे पाळण्यात दिसतात तसंच विराट कोहली हा दिग्गज क्रिकेटपटू होईल हे तेव्हाच कळत होतं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांनी विराट कोहलीला लक्ष्य केलं होतं. याच मॅचमध्ये विराटनं वैतागून प्रेक्षकांकडे पाहून त्याचं मधलं बोट दाखवलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी मॅच रेफ्री रंजन मदुगले यांनी मला त्यांच्या खोलीमध्ये बोलावलं. काल तू मैदानात बाऊंड्री लाईनवर उभा असताना नेमकं काय झालं? असा प्रश्न मदुगले यांनी मला विचारला. काहीच झालं नसल्याचं उत्तर मी मदुगलेंना दिलं. तेव्हा त्यांनी मला ऑस्ट्रेलियातली वृत्तपत्र दाखवली. या वृत्तपत्रांमध्ये माझे मधलं बोट दाखवतानाचे मोठे फोटो प्रसिद्ध झाले होते, असं कोहली म्हणाला. हे फोटो बघितल्यानंतर मला माफ करा पण माझ्यावर बंदी घालू नका, असं आवाहन मदुगले यांना केल्याची प्रतिक्रिया विराटनं दिली आहे.


रंजन मदुगुले हा चांगला माणूस आहे. मी तरुण होतो, अशा वयात या चुका होतात ते मदुगुलेंना माहिती होतं. त्यांनी मला सोडून दिलं, असं वक्तव्य विराटनं केलं आहे. विस्डन क्रिकेट मंथलीला विराट कोहलीनं मुलाखत दिली आहे.


लहान असताना केलेल्या काही गोष्टींबद्दल मला आज हसायला येत, पण या गोष्टीचा पश्चाताप मला नक्कीच नाही. माझं वागणं मी जगासाठी बदललं नाही, याचा मला अभिमान असल्याचं कोहली म्हणाला.