Rohit Sharma : क्रिकेट चाहत्यांसाठी रविवारचा दिवस खूप आनंदाचा गेला. अखेर टीम इंडियाने एशिया कपवर आठव्यांदा नाव कोरलं. तब्बल 10 विकेट्सने टीम इंडियाने श्रीलंकेवर विजय मिळवला आहे. आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने श्रीलंकेचा धुव्वा उडवला. यावेळी सामन्यानंतर रोहित शर्माने सर्व खेळाडूंचं कौतुक केलंय. 


टीम इंडियाचा विजय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाच्या मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) कहर केला अन् भारतीय टीमने श्रीलंकेला विरुद्ध दणदणीत विजय मिळवलाय. भारताने आशिया कपच्या फायनल सामन्यात श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला आहे. त्यामुळे आता भारतीय संघ आशियाचा नवा बादशाह झालाय. गतविजेत्या श्रीलंकेने दिलेल्या अवघ्या 51 रन्सने आव्हान पार करताना टीम इंडियाने एकही गडी न गमावला सामना खिशात घातला. शुभमन गिल आणि इशान किशनच्या जोडीने 7 ओव्हर्समध्ये काम फत्ते केलं.


यावेळी सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, आम्ही उत्कृष्ट कामगिरी केली. फायनल सामन्यामध्ये असा खेळ करणं खूप छान होते. यावरून टीमची मानसिकता दिसून येते. अशी कामगिरी दीर्घकाळ स्मरणात राहील. आमचे वेगवान गोलंदाज बऱ्याच दिवसांपासून मेहनत घेतायत. त्याला अशी कामगिरी करताना पाहून आनंद झाला. या ठिकाणी बॉल इतका टर्न होईल असं मला वाटलं नव्हतं. 


रोहित शर्मा पुढे म्हणाला, आम्ही इतकं काही करू असं कधीच वाटलं नव्हतं. सिराजला याचं खूप श्रेय दिलं पाहिजे. या स्पर्धेत आम्ही टीम म्हणून जे काही करता येईल ते केलं. आता आमचे लक्ष भारतात होणाऱ्या सिरीजवर आणि त्यानंतर वर्ल्डकपवर आहे. एवढ्या आत्मविश्वासाने टीम योग्य दिशेने जात असून याचा मला आनंद आहे.


8 व्यांदा कोरलं ट्रॉफीवर नाव


एशिया कपच्या इतिहासत टीम इंडिया अकराव्यांदा अंतिम फेरीत पोहचली होती. विशेष म्हणजे यात भारत आणि श्रीलंका आठवेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये पाचवेळा भारताने विजय मिळवला. तर श्रीलंका तीनवेळा विजयी ठरलीये. एशिया कपच्या इतिहासात टीम इंडियाने (Team India) तब्बल आठव्यांदा एशिया कपवर आपलं नाव कोरलं आहे.