Virat Kohli: अनेकांच्या म्हणण्यानुसार, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या नात्यांमध्ये कटुता असल्याच्या चर्चा आहेत. मात्र या दोघांच्या नात्यावर अखेर विराट कोहलीने विधान केलं आहे. गेल्या 10-15 वर्षांबाबत बोलायचे झाले तर भारतीय टीममध्ये प्रसिद्ध खेळाडू आले. मात्र पण विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन असे स्टार खेळाडू आहेत, ज्यांनी अनेक ऐतिहासिक सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिलाय. यावेळी विराट कोहलीने एका इंटरव्ह्यूमध्ये रोहितबाबत भाष्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली म्हणाला, "आम्ही 15-16 वर्षे एकत्र क्रिकेट खेळलो. आमचा एकत्र खेळण्याचा प्रवास खूप छान होता. टीम इंडियामध्ये फक्त 2-3 वरिष्ठ खेळाडू राहतील, असं मला कधीच वाटलं नव्हतं. मी रोहित शर्माला एक खेळाडू म्हणून वर येताना पाहिले आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत काय मिळवलंय ते देखील मी पाहिले आहे. तो आता भारतीय संघाचे नेतृत्व करतोय. आणिअ खरोखरच तो एक अद्भुत प्रवास आहे."


जर मला कोणी विचारले की तू 15 वर्षे कसा खेळलास, तर मला वाटत नाही की 15 वर्षे उलटली आहेत कारण पहिल्या दिवशी ज्या गोष्टी होत्या त्याच गोष्टी आजंही आहे. जोपर्यंत तुम्ही खेळता तोपर्यंत त्या गोष्टी कशात राहणार आहेत, असंही विराटने सांगितलं आहे


मुंबई इंडियन्सचा आरसीबीवर विजय


मुंबई इंडियन्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं विजयासाठी दिलेलं 197 रन्सचं लक्ष्य पार केलं आहे. मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात ओपनर ईशान किशन आणि रोहित शर्मानं केली होती. ईशान किशन आणि रोहित शर्मानं शतकी पार्टनरशिप केली. ईशान किशननं 34 बॉल्समध्ये 69 रन्स करुन मुंबईच्या विजयाचा पाया रचला. यानंतर मैदानात फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवनं फटकेबाजी केली. यानंतर सूर्यकुमारनेही तुफान खेळी करत 52 धावा केले आणि मुंबईला अखेर विजय मिळवून दिला.


मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा विजय


फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्त्वाखाली आरसीबीला यंदाच्या सिझनमध्ये पाचव्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. तर मुंबई इंडियन्सनं यावेळी सलग दुसरा विजय मिळवला. या विजयामुळे मुंबईच्या टीमने पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.