Kapil Dev Over Hardik Pandya debate: सध्या सुरू असलेल्या भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाची जबाबदारी हार्दिक पांड्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. दुसऱ्या सामन्यात विराट कोहली आणि  रोहित शर्माच्या यांना विश्रांती देत संजू सॅमसन आणि अक्षर पटेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं. मागील काही काळापासून हार्दिक पांड्या व्हाईट बॉल क्रिकेटपासून लांब होता. त्यानंतर त्याने कमबॅक केलंय. कंबरेतील दुखापतीनंतर हार्दिक पांड्या फक्त वनडे आणि टी-ट्वेंटी सामने खेळला होता. त्यावर अनेक सवाल देखील उपस्थित होताना दिसत आहेत. त्यावर आता कपिल देव यांनी मोठं वक्तव्य केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लिमिटेड ओव्हरमध्ये क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्या लक्ष देत असल्याने टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली होती. हार्दिक पांड्याचं शरीर कसोटी सामन्यांना साथ देत नसल्याचं रवी शास्त्री यांनी म्हटलं होतं. त्यावर आता वर्ल्ड कप विनर कपिल देव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी कपिल देव यांनी हार्दिक पांड्याला सल्ला देखील दिला आहे.


काय म्हणाले कपिल देव?


मी रवी शास्त्रींच्या विधानाचा आदर करतो, पण का? डेनिस लिलीपेक्षा कोणताही खेळाडू दुखापतग्रस्त झालेला नाही. त्यामुळेच माझा यावर विश्वास बसत नाही. मी कशातूनही सावरू शकतो. चांगल्या खेळात येऊ शकतो. जर आपण हार्दिक पांड्याबद्दल बोललो तर तो एक चांगला ऍथलीट आहे, तो मैदानात फिट दिसतो. त्याला त्याच्या शरीरावर खूप मेहनत करावी लागते. त्याचे शरीर मेहनत घेऊ शकत नाही का? असा सवाल कपिल देव यांनी विचारला आहे.


आणखी वाचा - IND vs WI: रोहित शर्मा कॅप्टन्सी सोडणार? पुढचा कॅप्टन कोण? स्पष्ट संकेत मिळाले!


रवी शास्त्री काय म्हणतात?


हार्दिक पांड्या आयपीएलदरम्यान फारशी गोलंदाजी करत नव्हता आणि तो फलंदाज म्हणून खेळत होता. त्यावेळी रवी शास्त्री यांनी हार्दिकवर एक वक्तव्य केलं होतं. हार्दिक पांड्याचं शरीर कसोटी क्रिकेटचा भार उचलू शकत नाही. हे अगदी स्पष्ट आहे. वर्ल्ड कपनंतर मला वाटतं की त्यानं व्हाईट बॉल क्रिकेटचं स्विकारलं पाहिजे आणि त्याची गरज आहे, असं वक्तव्य रवी शास्त्री यांनी केलं होतं. त्यावर आता कपिल देव यांनी आपलं मत मांडलं आहे.