Rohit Sharma In Chennai Super kings : हार्दिक पांड्याचं मुंबई इंडियन्सच्या संघात पुनरागमन झालं अन् रोहित शर्माला कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं. युवा खेळाडूला संघाची जबाबदारी देण्यासाठी रोहित शर्माबरोबर झालेलं गैरवर्तन मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) फॅन्सच्या जिव्हारी लागलं होतं. त्यामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबई इंडियन्स सोडणार, अशी चर्चा होताना दिसत आहे. अनेक खेळाडूंनी यावर भाष्य देखील केलंय. त्यामुळे आता रोहित कोणत्या संघाकडून खेळणार? यावर अनेक भविष्यवाणी केल्या जात आहेत. अशातच आता इंग्लडचा माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) याने मोठं वक्तव्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाला मायकल वॉन?


रणवीर अल्लाहबादिया याच्या बीयरबाइसेप्स पॉडकास्टमध्ये इंग्लंडच्या माजी कर्णधार मायकल वॉन याला आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. मायकल वॉन याला ज्यावेळी रोहित शर्मावर विचारण्यात आलं, तेव्हा त्याने बेधडक उत्तरं दिली. रोहित शर्माला आगामी हंगामात म्हणजे पुढच्या वर्षी चेन्नई सुपर किंग्जमध्ये पाहण्यास उत्सुक आहे, असं वक्तव्य मायकल वॉनने केलं आहे. रोहित चेन्नईच्या संघाची कॅप्टन्सी (CSK) देखील करू शकतो, असंही मायकल वॉनने म्हटलं आहे. मायकल वॉनने सुचक वक्तव्य करत क्रीडाविश्वात खळबळ उडवून दिली आहे.


रोहित शर्मा चेन्नईकडून खेळणार का? रोहित धोनीची गादी चालवणार का? असा प्रश्न विचारला जातोय. सध्या ऋतुराज गायकवाड चेन्नईची कॅप्टन्सी करतोय. मात्र, रोहितकडे कॅप्टन्सी दिली जाऊ शकते. मी रोहितला चेन्नई संघात पाहण्यासाठी उत्सुक आहे, असंही मायकल वॉनने म्हटलं आहे. मायकल वॉनच्या उत्तरावर रणवीरने प्रतिक्रिया दिली. असं झालं तर मुंबईच्या अनेक फॅन्सच्या भावना दुखावतील. मुंबईच्या फॅन्ससाठी हा धक्का असेल, असं रणवीर म्हणतो. जर रोहित हैदराबादमध्ये गेला तर आश्चर्य वाटणार नाही. कारण तो आधीही डेक्कन चार्जर्सचा भाग होता. फॅन्ससाठी हा रोमाँटिंक क्षण असू शकतो, असं रणवीरने म्हटल्यावर वॉनने उत्तर दिलं.


दरम्यान, मायकल वॉनने हसत हसत याचं उत्तर दिलंय. का? रोहितला देखील ट्रोल केलं जाईल का? नाही ना, मग तो चेन्नईकडूनच खेळणार, असं ठाम मत मायकल वॉनने व्यक्त केलं आहे. त्यामुळे आता रोहित खरंच चेन्नईकडून खेळणार की काय? असा सवाल विचारला जात आहे.