IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS 4th Test) यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) खेळवण्यात आली होती. ही सिरीज टीम इंडियाने 2-1 अशा फरकाने जिंकली. टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) या सामन्यामध्ये शानदार सेंच्युरी ठोकली. विराटने या सामन्यामध्ये 186 रन्सची खेळी करत चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं. विराटचा खोडकरपणा चाहत्यांना काही नवीन नाही. त्याच्या या खोडकरपणाची झलक पुन्हा एकदा या सामन्यात पाहायला मिळाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या शेवटच्या सामन्यामध्ये विराट एकदम मस्तीच्या मूडमध्ये दिसून आला. या सामन्यात तो प्लेअर्ससोबत मस्ती करताना दिसला, तर एकदा त्याने अंपायरला देखील ट्रोल केलं. विराटच्या आवाजाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये विराट, विमान मी उडवणार असं सांगतोय.


'विमानात मी पहिला बसणार'


व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये बॅकग्राऊंडमधून विराट कोहलीचा आवाज येतोय. यामध्ये विराट म्हणतोय, विमानात मी पहिल्यांदा जाऊन बसणार आणि विमान मीच उडवणार. दरम्यान चाहत्यांनी त्याच्या या वाक्यांना, 'आज प्लेन तेरा भाई उड़ाएगा...' याच्याशी जोडलं आहे.



विराटचा अजून एक व्हिडीओ होतोय व्हायरल


ऑस्ट्रेलियाच्या डावातील 34 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अश्विनने कांगारू फलंदाजाला क्रीझमधून हेड वाइड आणि राऊंड द विकेट बॉल टाकला. ज्यावर फलंदाज पूर्णपणे चुकला. अश्विनचा बॉल सरळ बॅटरच्या पॅडवर गेला पण अंपायरने आऊट दिला नाही. त्यामुळे भारतीय खेळाडू आक्रमक झाले. विराटने देखील आपल्या अंदाजात अंपायर नितिन मेनन (Umpire Nitin Menon) यांच्याशी शाब्दिक वाद घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, हास्यमय वातावरणात हा सर्व प्रकार घडला.


यादरम्यान विराट कोहली मैदानावरील पंचांच्या (Umpire) निर्णयावर चांगलाच संतापलेला दिसत आहे. त्यानंतर तो 'मी अंपायर असतो तर मी आउट दिलं असतं' असं म्हणताना ऐकायला मिळत आहे. त्यांचं संभाषण स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड करण्यात आलं होतं. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media Viral Video) व्हायरल होत आहे. अनेकांनी विराटवर टीका देखील केल्याचं पहायला मिळतंय.