ICC Annouced Schedule Of Womens T20 WC : आगामी वुमेन्स टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या आयोजनाविषयी मागील अनेक दिवसांपासून चर्चा होती. यंदाच्या वुमेन्स टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन बांगलादेशमध्ये होणार होते. मात्र, बांगलादेशमधील राजकीय अस्थिततेमुळे आता युएईमध्ये हा वुमेन्स टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. अशातच आता सर्वांना प्रतिक्षा होती. वुमेन्स टी-20 वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाची.. त्यातच आता आयसीसीने वुमेन्स टी-20 वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर केलं आहे. त्यानुसार भारत आणि पाकिस्तानचा हायप्रोफाईल सामना 6 ऑक्टोबर रोजी दुबईच्या आंतरराष्ट्रायी स्टेडियमवर खेळवला जाईल.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक गट स्पर्धेत चार गट सामने खेळतील, प्रत्येक गटातील दोन अव्वल संघ 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी उपांत्य फेरीत पोहोचतील आणि 20 ऑक्टोबर रोजी दुबई येथे अंतिम फेरीत प्रवेश करतील. उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस निश्चित करण्यात आला आहे. जर भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला तर ते उपांत्य फेरी 1 मध्ये खेळतील, असं आयसीसीकडून सांगण्यात आलं आहे. 


दुबई आणि शारजाह या दोन ठिकाणी एकूण 23 सामने खेळवले जाणार आहे. तर 28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत स्पर्धेपूर्वी 10 सराव सामने होणार आहेत. अ गटामध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघाचा समावेश आहे. तर ब गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि स्कॉटलंड या संघाचा समावेश करण्यात आलाय.


भारताच्या सामन्याचं वेळापत्रक


4 ऑक्टोबर, शुक्रवार : भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई, संध्याकाळी 6 वाजता
6 ऑक्टोबर, रविवार : भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई, दुपारी 2 वाजता
9 ऑक्टोबर, बुधवार : भारत विरुद्ध श्रीलंका, दुबई, संध्याकाळी 6 वाजता
13 ऑक्टोबर, रविवार : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजा, संध्याकाळी 6 वाजता
17 ऑक्टोबर, गुरुवार : उपांत्य फेरी १, दुबई, संध्याकाळी 6 वाजता
18 ऑक्टोबर, शुक्रवार : उपांत्य फेरी २, शारजाह, संध्याकाळी 6 वाजता
20 ऑक्टोबर, रविवार : फायनल, दुबई, संध्याकाळी 6 वाजता.