मुंबई : भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर (Team India Tour England 2021) जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना (WTC Final 2021) आणि इंग्लंड विरुद्ध 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. अंतिम सामना 18-22 जून दरम्यान साऊथम्पटनमध्ये खेळवण्यात येणार आहे. तर यानंतर 4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू मुंबईहून 2 जूनला  इंग्लंडला रवाना होतील. तर 3 जूनला इंग्लंडमध्ये पोहचतील. टीम इंडिया इंग्लंडमध्ये किती दिवस आणि कुठे क्वारंटाईन राहणार, नेट्सप्रॅक्टीस करण्याची मुभा मिळणार का, याबाबतची सर्व माहिती आयसीसीने ट्विट करत दिली आहे. (icc announced World Test Championship Final 2021 exemptions and bio safety measures announced)



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंड दौऱ्यासाठी जाणारे टीम इंडियाचे खेळाडू हे सध्या मुंबईत क्वारंटाईन आहेत. टीम इंडियाच्या मुंबईतील क्वारंटाईनला 19 मेपासून सुरुवात झाली होती. हा क्वारंटाईन कालावधी 1 जूनला समाप्त होणार आहे. हा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर टीम इंडिया 2 जूनला इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. मुंबईत क्वारंटाईन असताना आतापर्यंत खेळाडूंना अनेकदा कोरोना टेस्ट करण्यात आली. तसेच इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर खेळाडूंना कोरोनाचा नेगिटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागणार आहे.  


क्वांरटाईन कुठे आणि किती दिवस राहणार?


विराटसेना साऊथम्पटनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळणार आहे. या स्टेडियममध्येच एक हॉटेल आहे. या हॉटेलमध्येच खेळाडू क्वारंटाईन राहणार आहेत. क्वारंटाईन करण्याआधी खेळाडूंची कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. तसेच क्वारंटाईन झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या नियमांनुसार चाचण्या करण्यात येतील. मात्र किती दिवस क्वारंटाईन रहावे लागणार, याबाबतचा खुलासा आयसीसीने केलेला नाही.


टप्प्याटप्याने मिळणार सरावाची मुभा


आयसीसीच्या नियमांनुसार, खेळाडूंना टप्प्याटप्प्याने बायो बबलमधून काही तासांसाठी बाहेर पडण्याची परवानगी देण्यात येणार आहे. यासाठी खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह येणं बंधनकार असणार आहे. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर हळुहळु बायो बबलमधून मोठ्य़ा प्रमाणात सवलत देण्यात येईल. त्यानंतर खेळाडूंना ग्रृप करुन सराव करता येईल. मात्र खेळाडूंना बायो बबलमध्येच रहावे लागणार आहे.   


ड्युक बॉलने खेळवण्यात येणार सामना


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा फायनल सामना हा ड्युक बॉलने (Duke Ball) खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणाऱ्या सर्व सामन्यांमध्ये या ड्युक बॉलचा वापर करण्यात येतो. तसेच आयसीसीने हा महत्वाचा सामना टाय किंवा अनिर्णित राहिल्यास विजेता कसं ठरवणार, याबाबतही माहिती दिली आहे. सामना टाय किंवा ड्रॉ झाल्यास दोन्ही संघांना संयुक्तरित्या विजेतेपद देण्यात येईल. तसेच अनेकदा सामन्यादरम्यान विविध कारणांमुळे व्यत्यय येतो. यामुळे तेवढा वेळ वायो जातो. परिणामी तितक्या ओव्हर खेळ होत नाही. या महत्वाच्या सामन्यात असं झाल्यास त्याची भरपाई भरुन काढण्यासाठी 1 राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.