Umpires for the 2024 T20 World Cup : आयपीएल 2024 च्या हंगामानंतर अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या टी-ट्वेंटी विश्वचषकाची (T20 World Cup 2024) तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या मालिकेत या स्पर्धेत वापरण्यात आलेल्या 'ड्रॉप इन' खेळपट्ट्या फ्लोरिडाहून न्यूयॉर्कला आणल्या जात आहेत. त्यामुळे आता सर्वांची उत्सकुता निर्माण झाली आहे. अशातच आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आयसीसीने अंपायर्स (Umpires List) आणि रेफरीची घोषणा केली आहे. कुमार धर्मसेना ते क्रिस गेफेनी यांना यामध्ये संधी देण्यात आलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन भारतीय दिग्ग्जांना संधी


कुमार धर्मसेना, ख्रिस गॅफनी आणि पॉल रीफेल यांनी 2022 साली खेळल्या गेलेल्या मागील स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अंपायर्सची भूमिका बजावली होती.  सामना अधिकाऱ्यांच्या यादीत भारतातून दोन पंचांची निवड करण्यात आली असून त्यात जयरामन मदनगोपाल आणि नितीन मेनन यांच्या नावाचा समावेश आहे. तर  माजी भारतीय खेळाडू जवागल श्रीनाथ यांचं नाव सामनाधिकारींच्या यादीत समाविष्ट आहे.



टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी अंपायर्सची संपूर्ण लिस्ट - क्रिस ब्राउन, कुमार धर्मसेना, क्रिस गेफेनी, माइकल गॉफ, एड्रियन होल्डस्टोक, रिचर्ड इलिंगवर्थ, अलाउहद्दीन पालेकेर, रिचर्ड इलिंगवर्थ, जयारमन मदनागोपाल, नितिन मेनन, सॅम नोगाजस्की, अहसान रजा, राशिद रियाज, पॉल रिफिल, लँगटोन रुसेरे, शाहिद साईकट, रोडनी टकर, एलेक्स वॉर्फ, जोएल विल्सन आणि आसिफ याकूब.


टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी रेफरीची लिस्ट - डेविड बून, जॅफ क्रो, रंजन मदुगले, एंड्रयू पायक्रॉफ्ट, रिची रिचर्ड्सन, जवागल श्रीनाथ.


ग्रुप एः भारत, पाकिस्तान, आयरलँड, कनाडा, अमेरिका
ग्रुप बीः इंग्लँड, ऑस्ट्रेलिया, नामीबिया, स्कॉटलँड, ओमान
ग्रुप सीः न्यूजीलँड, वेस्टइंडीज, अफगानिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ग्रुप डीः दक्षिण अफ्रीका, श्रीलंका, बांग्लादेश, नीदरलँड, नेपाल