मुंबई : आयसीसी (ICC)ने काही दिवसांपूर्वीच ICC Player of the Month ची घोषणा केली होती. जानेवारीमध्ये हा अवॉर्ड भारताचा विकेटकीपर रिषभ पंतने जिंकला होता. त्यानंतर आता फेब्रुवारीचा ICC Player of the Month हा अवॉर्ड रविचंद्रन अश्विनला (R Ashwin) जाहीर झाला आहे. महिला वर्गात हा अवॉर्ड इंग्लंडची महिला क्रिकेटर Tammy Beaumont ने मिळवला आहे. (R.ashwin become ICC Player of the Month)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर अश्विनला इंग्लंड विरुद्ध केलेल्या शानदार कामगिरीसाठी हा अवॉर्ड मिळाला आहे. आर अश्विनने इंग्लंड विरुद्ध तीन टेस्ट सामन्यांमध्ये 20 हून अधिक विकेट घेतल्या आहेत. त्याने एक शतक देखील ठोकलं आहे.  त्याने इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुटला मागे टाकत हा अवॉर्ड जिंकला आहे. मागच्या महिन्यात देखील जो रूट या स्पर्धेत होता. पण हा अवॉर्ड ऋषभ पंतने पटकावला होता.


इंग्लंडच्या विरुद्ध फेब्रुवारीमध्ये अश्विनने एक शतक देखील ठोकलं होतं. गोलंदाज म्हणून त्याने 24 विकेट घेतले. या दरम्यान त्याने 400 विकेट घेण्याचा रेकॉर्ड देखील आपल्या नावावर केला. सर्वात जलद 400 विकेट घेणारा तो जगात दुसरा गोलंदाज ठरला आहे. मॅन ऑफ द सीरीजचा खिताब देखील त्याने जिंकला. 


इंग्लंडच्या टॅमी ब्यूमाउंटने तीन वनडे सामन्यांमध्ये फेब्रुवारी महिन्यात तीन सामन्यांमध्ये अर्धशकत केले. तिने एकूण 231 रन केले. ज्यामुळे तिला आयसीसी वुमेंस प्लेयर ऑफ द मंथचा खिताब मिळाला होता.


भारतीय संघाने चार सामन्यांची टेस्ट सीरीज (Test Series) 3-1 ने जिंकली. शेवटचा सामना भारताने एक इनिंग आणि 25 रनने जिंकला होता. या विजयासह टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) फायनलमध्ये पोहोचली आहे. टीम इंडियाचा सामना आकता न्युझीलंड सोबत होणार आहे. 18 ते 22 जून दरम्यान हा सामना खेळला जाणार आहे. 


भारतीय संघ घरच्या मैदानावर लगोपाठ 13वी सीरीज जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. भारताने चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडला 135 रनवर ऑलआऊट केलं. रविचंद्रन अश्विनने 47 रन देत 5 विकेट घेतले होते तर अक्षर पटेलने 48 रन देत 5 विकेट घेतले होते. पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडने 205 रन केले होते. भारतीय संघाने आपल्या पहिल्या इनिंगमध्ये 365 रन केले होते. दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडच्या संघाकडून डॅनियल लॉरेंसने सर्वाधिक 50 रन केले होते. (Ind vs Eng)