मुंबई: सर्वाधिक विकेट्स घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या क्रिकेटपटूवर ICCकडून 8 वर्षांसाठी बंदी घातल्यात आली आहे. या क्रिकेटपटूवर गंभीर आरोप असल्यानं त्याच्यासह आणखी एक क्रिकेटपटूवर देखील ही बंदी घालण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी संयुक्त अरब अमिराती (UAE) चे दोन क्रिकेटपटू मोहम्मद नावीद आणि शैमान अन्वर बट असं या क्रिकेटपटूंची नावं आहेत. टी -20 वर्ल्डकपच्या 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत मॅच फिक्स करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपानंतर 8 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. 


या दोन खेळाडूंवर ही बंदी 16 ऑक्टोबर 2019 पासून लागू होईल जेव्हा त्यांच्यावर मॅच फिक्सिंग आणि ICCच्या भ्रष्टाचारविरोधी नियमांचा भंग केल्याचा आरोप झाला. 33 वर्षीय माजी कर्णधार नवीद UAE कडून 40 वन डे आणि 31 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. 


पावर प्लेमध्ये भारतीय गोलंदाजांना मोठं अपयश, 5 कारणांमुळे गमावला तिसरा टी 20 सामना


आयसीसीने जारी केलेल्या निवेदनात, आयसीसीच्या 'इंटिग्रिटी युनिट' चे सरव्यवस्थापक अलेक्स मार्शल यांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद नावीद आणि शिमन अन्वर यांनी युएईचे प्रतिनिधित्व केले होते. नवीदची कर्णधार आणि सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू म्हणून वेगळी ओळख होती. दोन्ही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे अनेक सामने खेळले आहेत. 


या दोन्ही खेळाडूंनी मात्र आपल्या टीम सोबतच UAE क्रिकेटचाही विश्वासघात केला. त्यांच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप लावण्यात आला आहे. या दोन्ही खेळाडूंवर झालेल्या आरोपाची गंभीर दखल घेऊन ICC ने 8 वर्षांसाठी दोन्ही खेळाडूंवर बंदी घातली आहे.