दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने क्रिकेटच्या काही नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात क्रिकेटमध्ये काही वेगळं चित्र दिसणार आहे. लंडनमध्ये आयोजिक वार्षिक बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत या नवीन नियमांमध्ये बदलाची घोषणा करण्यात आली. जास्त वेळ घेत ओव्हर टाकण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. याआधी स्लो ओव्हर रेटासाठी फक्त टीमच्या कर्णधाराला दंड ठोठावण्यात येत होता. पण आता संपूर्ण टीमला दंड लावण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्यात आता कर्णधाराला सस्पेंड करण्याचा नियम बंद होणार आहे. पण स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसी टेस्ट चॅपियनशिपमध्ये खेळाडूंचे पॉईंट कमी केले जाणार आहेत. सध्याच्या नियमानुसार, कर्णधाराला मॅच फीच्या ५० टक्के दंड लावण्यात येतो. इतर गोष्टीवर १०-१० टक्के दंड लावण्यात येत होता. तर लागोपाठ ३ वेळा असं झाल्याचं कर्णधाराला सामन्यातून बाहेर बसवलं जायचं. पण आयसीसीच्या या नव्या नियमामुळे कर्णधारांना दिलासा मिळाला आहे.


दरम्यान आज झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड आणि संघाचे तात्काळ प्रभावाने निलंबन करत असल्याची घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) केली. आयसीसीच्या वार्षिक बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. रिपोर्ट्सनुसार, लोकशाही पद्धतीने निष्पक्ष निवडणूक न झाल्याने आणि क्रिकेट प्रशासनात राजकारण घुसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. 


लोकशाही पद्धतीने निष्पक्ष निवडणूक घेण्यात झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड अपयशी ठरले. तसेच सरकारी हस्तक्षेप मोडून काढण्यातही त्यांना अपयश आले. त्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली,' असं आयसीसीने म्हटले आहे.