AUS vs IND: Shubman Gill सौरव गांगुलीमुळे आऊट झाला? ICC च्या निवेदनामुळे नवा ट्विस्ट
ICC On Shubman Gill Wicket: शुभमन गिल आऊट प्रकरणात सॉफ्ट सिग्नलचा (soft signal) वापर केला गेला नाही, असं आयसीसीने सांगितलं आहे.
Shubman Gill Catch Controversy: भारत आणि ऑस्ट्रेलिया (AUS vs IND) या दोन्ही संघात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा फायनल सामना खेळवला जात आहे. सध्या टीम इंडिया संकटात असून संकटमोचक कोण ठरणार असा सवाला आता विचारला जातोय. शुभमन गिलची (Shubman Gill) विकेट गेल्याने टीम इंडिया पुन्हा बॅकफूटवर आल्याचं दिसतंय. शुभमन गिलची विकेटवरून अनेक सवाल उपस्थित होताना दिसत आहेत. नेटकऱ्यांनी शुभमन गिलच्या विकेटला माजी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना दोषी ठरवलं होतं. त्यावर आता आयसीसीने (ICC) निवेदन देत स्पष्टीकरण दिलंय.
ICC ने काय सांगितलं?
शुभमन गिल आऊट प्रकरणात सॉफ्ट सिग्नलचा (soft signal) वापर केला गेला नाही. जून महिन्यात हा निर्णय काढून टाकण्यात आला होता. त्यामुळे थर्ड अंपायर्सने (third umpires) सर्व कॅमेरा ऍंगलमधून पाहून अंतिम निर्णय घेतला. ग्रीन याची बोटे सुरुवातीला चेंडूच्या खाली आली होती. अंपायर्सला ज्यावेळी वाटेल की, बॉल हातात आणि फिल्डरच्या नियंत्रणात आहे. तेव्हा ते फलंदाजाला बाद दिलं गेलं. त्यामुळे बॉल जमिनीला लागला तरी फलंदाज नाबाद ठरत नाही. त्यामुळे गिल हा बाद ठरतो, असं आयसीसीने ट्विट करून सांगितलं आहे.
सौरव गांगुली यांच्या नेतृत्वातील कमिटीने मे महिन्यातच सॉफ्ट सिग्नलचा नियम क्रिकेटमधून काढून टाकला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी सौरव गांगुलीला धारेवर धरलं आहे. त्याचबरोबर नेटकऱ्यांनी बीसीसीआयला देखील खडेबोल सुनावले आहेत. शुभमन गिल बाद झाल्यानंतर त्याने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर, वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. आपण तिसऱ्या पंचांनी दिलेला निर्णय स्वीकारायला हवा, असं बीसीसीआयचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी एएनआयशी बोलताना म्हटलं आहे.
दरम्यान, नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार भारताला एकाच ओव्हरमध्ये 2 मोठे धक्के बसले आहेत. स्कॉट बोलँडच्या गोलंदाजीवर विराट कोहली आणि रवींद्र जडेजा एकाच ओव्हरमध्ये आऊट झाले. त्यामुळे आता टीम इंडियाची धुरा अजिंक्य रहाणे आणि केएस भरत यांच्या खांद्यावर आहे. हा सामना जिंकून टेस्टचा बादशाह कोण ठरणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.