दुबई : राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये 'द वॉल'चा वारसदार म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते त्या चेतेश्वर पुजाराचा आज ३१ वा वाढदिवस आहे. पुजाराला वाढदिवसानिमित्त आयसीसीने आपल्या ट्विटर हॅंडलवरुन अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



आयसीसीने शुभेच्छा देत म्हटले आहे की, चेतेश्वर पुजारा हा खराखुरा कसोटी खेळाडू आहे. पुजारा हा आतापर्यंत भारतीय संघासाठी एका डावात ५०० पेक्षा जास्त चेंडू खेळणारा खेळाड़ू आहे. रांचीत २०१७ ला झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा विक्रम पुजाराने केला होता. पुजाराने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात तीनवेळा शतकी कामगिरी केली होती.


पुजाराची कसोटी कारकीर्द


ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेली द्विसंघ कसोटी मालिका भारताने पहिल्यांदाच जिंकली. या विजयात पुजाराचा महत्त्वपूर्ण वाटा होता. पुजारा आतापर्यंत एकूण ६८ कसोटी सामने खेळला असून, त्याने ५१.१८ च्या सरासरीने ५४२६ धावा केल्या आहेत. यात त्याने २० अर्धशतके तर १८ शतके देखील केली आहेत. चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात २०१० साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. भारताचा सलामीवीर गौतम गंभीरला दुखापत असल्याने त्याला खेळण्याची संधी मिळाली होती.


आयसीसीकडून दरवर्षी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. पुजाराला २०१३ सालचा आयसीसीकडून देण्यात येणारा उद्योन्मुख क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात आला होता.


अधिक वाचा | ...म्हणून कसोटी स्पेशालिस्ट पुजारा काही महिन्यांसाठी 'गायब' होणार