मुंबई : आयसीसीने (ICC) 2021 या वर्षातील सर्वोत्तम टेस्ट प्लेइंग इलेव्हन टीम निवडली आहे. आयसीसीने 2021 मध्ये शानदार कामगिरी केलेल्या खेळाडूंचा या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. आयसीसीने प्लेइंग इलेव्हनमध्ये एकापेक्षा एक खेळाडूंना संधी दिली आहे. (icc mens test team 2021 rohit sharma r ashwin and rishabh pant captain kane williamson)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचे किती खेळाडू?


आयसीसीने या प्लेइंग इलेव्हनमध्ये (Playing 11) टीम इंडियाच्या 3 खेळाडूंची निवड केली आहे. आयसीसीने रोहित शर्मा, रिषभ पंत आणि रवीचंद्रन अश्विन या तिकडीची निवड केली आहे. 


आयसीसीने ओपनर म्हणून टीम इंडियाचा रोहित शर्मा आणि श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने या जोडीची ओपनर म्हणून निवड केली आहे. मार्नस लाबुशेन तिसऱ्या नंबरवर खेळेल. इंग्लंडचा कर्णधार जो रुट चौथ्या स्थानी बॅटिंग करेल. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनला 5 व्या क्रमांकाची जबाबदारी देण्यात आली. सहाव्या स्थानी पाकिस्तानचा फलंदाज फवाद आलम आहे.  


विकेटकीपर कोण? 


आयसीसीने विकेटकीपिंगची जबाबदारी रिषभ पंतला दिली आहे. तर अश्विन एकमेव स्पिन गोलंदाज असणार आहे. तसेच कायले जेमीन्सन, हसन अली आणि शाहिन अफ्रिदी यांच्या खांदयावर फास्ट बॉलिंगची जबाबदारी आहे.   


आयसीसीची बेस्ट टेस्ट प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा, दिमुथ करुणारत्ने, मार्नस लाबुशेन, जो रूट, केन विलियमसन (कर्णधार), फवाद आलम, रिषभ पंत (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, काइल जैमीन्सन, हसन अली आणि शाहीन आफ्रिदी.