ICC Ranking : वन डेमध्ये भारताला मागे टाकत दक्षिण आफ्रिका टॉपवर
दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी)च्या वन डे टीम रँकिंगमध्ये भारताला मागे टाकत टॉपवर पोहचली आहे.
दुबई : दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी)च्या वन डे टीम रँकिंगमध्ये भारताला मागे टाकत टॉपवर पोहचली आहे.
आयसीसीच्या ताज्या रँकिंगनुसार दक्षिण आफ्रिका टीमने ५२ सामन्यात ६२४४ अंक मिळवत वन डे टीम रँकिंगमध्ये प्रथम स्थान पटकावले आहे.
बांगलादेश विरूद्ध खेळण्यात आलेल्या दुसऱ्या वन डे सामन्यात विजय मिळविल्यानंतर हे यश संपादन केले आहे.
भारताचा वन डे रँकिंगमधील अव्वल स्थान हेरावले गेले असून दुसऱ्या स्थानावर गेली आहे. भारताने ५० सामन्यात ५९९३ अंक मिळवले आहेत.
भारताने ऑस्ट्रेलिियाचा वन डे सिरीजमध्ये ४-१ ने धुवाँ उडवल्यानंतर प्रथम स्थान पटकावले होते.
भारताला आता प्रथम स्थान मिळविण्यासाठी येत्या २२ ऑक्टोबर पासून न्यूझीलंड विरूद्ध होणाऱ्या होम सिरीजमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे.