मुंबई : भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशात क्रिकेट फार लोकप्रिय आहे. क्रिकेट म्हणजे तो खेळ सोडून देशप्रेमापर्यंत जातं. भारतातील क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी आहे. आयसीसी रँकिंगमध्ये भारताला पाकिस्तानने मागे टाकलं आहे. टीम इंडियाने सध्या कोणताच वन डे सामना खेळला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुल्तानमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत नुकत्याच झालेल्या यशानंतर बाबर आझमच्या पाकिस्तान संघाने सोमवारी जाहीर केलेल्या ताज्या ICC वनडे क्रमवारीत भारताला मागे टाकण्यात यश मिळवलं. 


मालिकेत क्लीन स्वीप केल्यानंतर पाकिस्तानचे 106 रेटिंग आहेत आणि ते भारतापेक्षा एका पॉईंटने पुढे आहेत. न्यूझीलंड 125 रेटिंगने पहिल्या क्रमांकाचा कायम आहे. त्यानंतर इंग्लंड (124) आणि ऑस्ट्रेलिया (107) यांचा क्रमांक लागतो. पाकिस्तानचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे.


भारताला आता पुढच्या वन डे सामन्यात जिंकणं भाग आहे. नाहीतर पिछाडीवर जाणं निश्चित आहे. आता इंग्लंड, वेस्ट इंडिज तीन वन डे सामने खेळणार आहेत. तर पाकिस्तान पुढचा वन डे सामना ऑगस्टमध्ये खेळणार आहे. 


बाबार आझमने वेस्ट इंडिज विरुद्ध सामन्यात दोन वेळा शतक ठोकलं. विराटचा रेकॉर्ड तोडण्याच्या तयारीत आहे. कमी वयातच बाबर आझमने आपल्या कामगिरीनं जगभरात डंका वाजवला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने 9 डावात त्याने 50 हून अधिक स्कोअर केला आहे. 


पाकिस्तानची टीम सध्या फॉर्ममध्ये आहे. टी 20 वर्ल्ड कप 2021 नंतर पाकिस्तानच्या टीमने तुफान कामगिरी केली आहे. शाहीन आफ्रिदीला तर आयसीसी मेन्स प्लेअर ऑफ द इयर मिळालं आहे. टीम इंडियासाठी मात्र ही टेन्शन देणारी गोष्ट आहे.