ICC ODI World Cup 2023 Rules: येत्या 5 तारखेपासून आयसीसी वनडे वर्ल्डकपचं ( ICC ODI World Cup 2023 ) बिगुल वाजणार आहे. यंदाचा वनडे वर्ल्डकप भारतात आयोजित केला गेला आहे. क्रिकेट चाहते गेल्य अनेक काळापासून याची वाट पाहतायत. वर्ल्डकपमध्ये पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि गेल्या वेळचा उपविजेता न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्य म्हणजे यावेळी वर्ल्डकप ( ICC ODI World Cup 2023 ) एक वेगळा इतिहास घडणार आहे. या वेळी अशा काही गोष्टी घडणार आहेत, ज्या यापूर्वी कधीही घडल्या नाहीत. यामध्ये अनेक नियम बदलण्यात आले आहेत. जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत, त्या प्रथमच पहायला मिळतील. 


भारत पहिल्यांदा एकटाच करणार आयोजन


यंदाच्या वर्ल्डकपचं यजमानपद एकटा भारत देश भूषवणार आहे. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत एकट्याने वर्ल्डकपचं यजमानपद भूषवणार आहे. यापूर्वी भारताने 1987, 1996 आणि 2011 मध्ये संयुक्तपणे वनडे क्रिकेट वर्ल्डकपचं ( ICC ODI World Cup 2023 ) आयोजन केलं होतं. वर्ल्डकप भारतात आयोजित असल्यामुळे टीम इंडिया विजयाची प्रबळ दावेदार मानली जातेय.


इतिहासात पहिल्यांदाच वेस्ट इंडिज वर्ल्डकपच्या बाहेर


यंदाच्या वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजची टीम नसणार आहे. हा असा पहिलाच वर्ल्डकप असेल जिथ वेस्ट इंडिजची टीम कोणत्याही वनडे वर्ल्डकपचा भाग नसणार आहे. क्रिकेट इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. 1975 आणि 1979 च्या वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडीजने क्लाइव्ह लॉईडच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला होता. मात्र यंदाच्या वेळी या टीमला वर्ल्डकपसाठी पात्रता मिळवता आलेली नाही.


बाउंड्री काऊंटचा नियम हद्दपार


गेल्या वर्ल्डकप 2019 च्या फायनलमध्ये बाऊंड्री काऊंटच्या नियमाने खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी फायनल सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात बरोबरीत सुटला. यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हर देखील बरोबरीत सुटल्याने बाऊंड्री काऊंटच्या नियमावर आधारित निकाल देत सर्वाधिक चौकार मारल्यामुळे इंग्लंडला चॅम्पियन घोषित करण्यात आलं. त्यावेळी हा नियम बराच वादग्रस्त मानला जात होता. अखेर यावर टीका झाल्यानंतर आयसीसीने हा नियम बदलला. आता जर सामन्यानंतर सुपर ओव्हर टाय झाली, तर निकाल जाहीर होईपर्यंत सुपर ओव्हर्स सतत खेळल्या जाणार आहेत. 


70 मीटरपेक्षा कमी बाऊंड्री नसणार


यंदाच्या वर्ल्डकपसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अनेक ठिकाणच्या खेळपट्टी क्युरेटर्ससाठी 'प्रोटोकॉल' तयार केलाय. आयसीसीने खेळपट्ट्यांवर अधिक गवत ठेवण्यास सांगितलं असून बाऊंड्रीचा आकार 70 मीटरपेक्षा कमी नसावा, असंही सांगितले. बाऊंड्री लाईनचा हा मुद्दा याआधी वर्ल्ड कपमध्ये कधीच समोर आला नव्हता.


सॉफ्ट सिग्नल यंदाच्या वर्ल्डकपमध्ये नाही


आयसीसीने या वर्षी जूनपासून सॉफ्ट सिग्नल नियम रद्द केला आहे. म्हणजेच हा सॉफ्ट सिग्नल नियम यावेळी वर्ल्ड कपमध्ये दिसणार नाही. सॉफ्ट सिग्नल म्हणजे बॉलिंगच्या टोकाला उभ्या असलेल्या अंपायरकडून तिसर्‍या पंचापर्यंत व्हिज्युअल संवाद असतो. ज्यामध्ये मैदानावरील अंपायर आपला निर्णय देतो, नंतर त्याच निर्णयावर अंपायरचा रिव्ह्यू (थर्ड अंपायर रिव्ह्यू) घेतो.


सॉफ्ट सिग्नलनुसार, यामध्ये ऑनफिल्ड अंपायर थर्ड अंपायरची मदत घेऊ शकतात. पण त्याआधी, गोलंदाजीच्या टोकाला उभ्या असलेल्या अंपायरला इतर पंचांशी सल्लामसलत करून निर्णय द्यावा लागतो. यानंतर तो सॉफ्ट सिग्नल नियमानुसार थर्ड अंपायरशी बोलतो. यामध्ये थर्ड अंपायर त्या आऊटच्या संदर्भात व्हिडिओ फुटेज पाहतो.


याचं उदाहरण म्हणजे, एखाद्या फलंदाजाला मैदानावरील अंपायरने झेलबाद केलं. मात्र यावरून परंतु हा कॅच संशयास्पद असल्यास या कॅचच्या व्हिडिओ फुटेजमध्ये थर्ड अंपायरलाही पुरेसा पुरावा मिळाला नाही, तर मैदानावरील अंपायरचा निर्णय एकमतानेच राहतो.