ICC ODI WC 2023, Team India Full Schedule: यंदाच्या वर्षी खेळवल्या जाणाऱ्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचं पूर्ण वेळापत्रक नुकतंच जाहीर करण्यात आलं असून, क्रिकेट विश्वासह संपूर्ण क्रीडाजगताची नजर या वेळापत्रकावर खिळली आहे. क्रिकेटचा महाकुंभ अशी ओळख असणाऱ्या या WC2023 मध्ये भारतीय संघाचे सामने नेमके कधी आणि कुठे खेळवले जाणार आहेत तेसुद्धा एकदा पाहूनच घ्या. 


5 ऑक्टोबरपासून होणार शुभारंभ... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटच्या एकदिवसीय विश्वचषकाची सुरुवात यंदा 5 ऑक्टोबर रोजी सुरु होणार असून, 2019 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील संघ, इंग्लंड आणि न्यूझीलंड यंदाच्या वर्षी पहिल्याच सामन्यात आमनेसामने येणार आहेत. गुजरातमधील अहमदाबाद येथे असणाऱ्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे या सामना खेळवला जाईल. तर, भारत या स्पर्धेत 8 ऑक्टोबरला पहिला सामना खेळेल. पाच वेळा विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरोधात भारतीय संध मैदानात उतरेल. 


कोणत्या दिवशी आहेत भारतीय संघाचे सामने 


8 ऑक्टोबर - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (चेन्नई)
11 ऑक्टोबर - भारत विरुद्ध अफगाणिस्तान (अहमदाबाद)
15 ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान (अहमदाबाद)
19 ऑक्टोबर - भारत विरुद्ध बांगलादेश (पुणे)
22 ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड (धरमशाला)
29 ऑक्टोबर - भारत विरुद्ध इंग्लंड (लखनऊ)
2 नोव्हेंबर - भारत विरुद्ध Qualifier 2 (मुंबई)
5 नोव्हेंबर - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (कोलकाता)
11 नोव्हेंबर - भारत विरुद्ध Qualifier 1 (बंगळुरू)


हेसुद्धा वाचा : भारत-पाकिस्तान World Cup सामन्याच्या तारखेची घोषणा! भारतातील 'या' शहरात रंगणार सामना




10 संघ एक विश्वचषक आणि अटीतटीच्या लढती...


यंदाच्या वर्षी विश्वचषक स्पर्धेमध्ये 10 संघ सहभागी होतील. ज्यामध्ये 9 साखळी सामने प्रत्येक संघ खेळेल. तर, इथून यशस्वी होऊन पुढे चार संघ बाद फेरीतील सामन्यांसाठी मजल मारतील. जिथून अखेरच्या टप्प्यावर म्हणजेच अंतिम सामन्यात यंदाचा जगज्जेता संघ ठरवला जाईल. यंदाच्या विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर 2023, रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे खेळवला जाईल.