ICC चा रोहित शर्मा आणि विराट कोहलीला धक्का
आयसीसीच्या अवॉर्डचं नॉमिनेशन जारी करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : आयसीसीच्या अवॉर्डचं नॉमिनेशन जारी करण्यात आलं आहे. मात्र यंदाच्या वर्षीच्या नॉमिनेशनमध्ये भारतीय टीमचे कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं नाव नाहीये. तर यावेळी पाकिस्तानी खेळाडूंची चमक दिसून आली आहे.
आयसीसी प्रत्येक वर्षी तिन्ही फॉर्मसाठी अवॉर्ड देतात. यानुसार यंदाही नॉमिनेशन जारी करण्यात आली मात्र यामध्ये रोहित शर्मा किंवा विराट कोहली यांच्या नावाचा समावेश नाहीये. दरम्यान या दोन्ही खेळाडूंनी गेल्यावर्षी चांगला खेळ केला होता. तर 'प्लेयर ऑफ द ईयर' अवॉर्डच्या यादीत आर.अश्विनच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.
आयसीसी अवॉर्डमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना नामांकन मिळाले आहे. ICCने 2021 च्या एकदिवसीय क्रिकेटपटूसाठी बाबर आझम, ICC T20 प्लेयर ऑफ द इयरसाठी मोहम्मद रिझवान आणि शाहीन आफ्रिदीची सर गॅरी सोबर्स ट्रॉफीसाठी निवड केली आहे.
एकाही इंडियाच्या खेळाडूना वनडे आणि टी-20साठी जागा मिळालेली नाही. यावर्षी पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी जबरदस्त कामगिरी करत जगभरातील टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलंय. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान टीमने चांगली कामगिरी केली.
वनडे क्रिकेटर ऑफ द ईयर
1.शाकिब अल हसन (बांग्लादेश)
2. बाबर आझम (पाकिस्तान)
3. यानेमन मलान (दक्षिण अफ्रिका)
4. पॉल स्टर्लिंग (आयरलंड)
सर गॅरी सोबर्स ट्रॉफी
1. शाहीन अफरीदी (पाकिस्तान)
2. जो रूट (इंग्लंड)
3. मोहम्मद रिझवान (पाकिस्तान)
4. केन विल्यमसन (न्यूझीलंड)
टी20 क्रिकेटर ऑफ द ईयर
1. बाबर आजम (पाकिस्तान)
2. जॉस बटलर (इंग्लैंड)
3. मिचेल मार्श (ऑस्ट्रेलिया)
4. वानिंदु हसरंगा (श्रीलंका)