स्टार बॉलरवर ICC ने घातली बंदी, मोठ्या गुन्ह्यात दोषी आढळल्याने कारवाई
आयसीसीने स्टार बॉलवर कठोर कारवाई केली. डोपिंग प्रकरणात दोषी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.
मुंबई : आयसीसीने स्टार बॉलवर कठोर कारवाई केली. डोपिंग प्रकरणात दोषी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. याआधी देखील डोपिंग प्रकरणात अनेक खेळाडूंवर कठोर कारवाई करण्यात आली होती. तो खेळाडू कोण आहे आणि नेमकी काय कारवाई करण्यात आलीय जाणून घेऊया.
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज शोहिदुल इस्लामवर आयसीसीकडून कारवाई करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं त्याला बॅन केलं आहे. डोपिंग प्रकरणात कलम 2.1 चे उल्लंघन केल्यानं शोहिदुल दोषी असल्याचं समोर आलं. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्याला 10 महिन्यांसाठी सगळ्या फॉरमॅटमधून निलंबित करण्यात आले आहे.
ICC च्या स्पर्धाबाह्य चाचणी कार्यक्रमाचा भाग म्हणून 4 मार्च 2022 रोजी ढाका येथे शोहिदुलची चाचणी करण्यात आली. ज्यामध्ये क्लॉमिफेनचे असल्याचे आढळून आले. क्लॉमिफेन खेळाडूंना घेण्याची परवानगी नसल्याचं यादीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे त्याने डोपिंग प्रकरणी 2.1 नियमाचं उल्लंघन केल्याचं सांगण्यात आलं.
शोहिदुलला दोषी ठरवण्यात आलं. त्याला टीममधून बाहेर काढण्यात आलं. शोहिदुल याने कोणतीही बेपर्वाही केली नाही. त्याने घेतलेल्या एका औषधामध्ये क्लॉमिफेन असल्याचं समोर आलं. याबाबत शोहिदुल याने आयसीसीला स्पष्टीकरणही दिलं आहे.
बॉलरने नियमाचं उल्लंघन केल्याचं मान्य केलं असून त्याला 10 महिने निलंबित करण्यात आलं आहे. 28 मार्च 2023 पर्यंत तो कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळू शकणार नाही.