ICC action on Wanindu Hasaranga : श्रीलंका आणि अफगाणिस्तान (SL vs AFG) यांच्यात तीन सामन्यांची T20 मालिका खेळली गेली. ही मालिका श्रीलंकेने 2-1 ने जिंकला असून शेवटच्या T20 सामन्यात श्रीलंका संघाला अफगाणिस्तानविरुद्ध 3 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या कारणामुळे श्रीलंकेला अफगाणिस्तानविरुद्ध क्लीन स्वीप करता आला नाही. मात्र तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर आयसीसीने श्रीलंकेचा कर्णधार वानिंदू हसरंगा आणि अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू रेहमानुल्ला गुरबाज यांच्यावर कारवाई केली आहे.


नेमकं काय प्रकरण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेचा नवा ट्वेंटी-20 कर्णधार वानिंदू हसरंगा याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शनिवारी अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतील पराभवादरम्यान पंचांच्या गैरवर्तनासाठी निलंबित केले. 26 वर्षीय खेळाडूने सामन्यानंतर मैदानावरील पंच लिंडन हॅनिबल यांना उंच बॉलवर नो-बॉल न दिल्याबद्दल फटकारले. कामिंडू मेंडिसच्या शेवटच्या षटकात श्रीलंकेला तीन विकेट आणि 11 धावांची गरज होती.  त्यावेळी मोमंदने उंच चेंडू टाकला..यावर अंपायर हॅनिबलने नो बॉलचा इशारा दिला नाही. त्यावेळी श्रीलंकेसाठ कमिंडू मेंडिस फलंदाडी करत होता. हा चेंडून कामिंदू सरळ उभा असला असता, तरी चेंडू त्याच्या कमरेच्यावरुन गेला असता, तरीही अंपायरने त्याला नो बॉल म्हटले नाही.



अंपायच्या या निर्णयावर प्रमुख वनिंदू हसरंगला भयंकर रागा आला आणि त्यांने निषेध केला. त्याच्या मते, आंतरराष्ट्रीय सामन्यात असे होऊ नये आणि त्याने मैदानात येऊन अंपायरशी वाद घातला. त्यामुळे आयसीसीने दोन्ही कर्णधारांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आणि सामन्यात श्रीलंकेचा 3 धावांनी झालेला पराभव मान्य करावा लागला. 


वनिंदू हसरंगा काय म्हणाला?


अंपायरच्या निर्णयाबाबत हसरंगा म्हणाला, “आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अशा गोष्टी घडतात. जर बॉल कमरेच्या उंचीच्या जवळ असेल तर कोणतीही अडचण येणार नव्हती. पण एवढ्या उंचीवर गेलेला चेंडू थोडा पुढे गेला असता तर तो फलंदाजाच्या डोक्याला लागला असता. जर तुम्हाला ते दिसत नसेल, तर अंपायर आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी पात्र नाही. त्यामुळे अंपायरिंग करण्याऐवजी त्याने आणखी काही काम केले असते तर बरे झाले असते.” 


श्रीलंकेचा टी-20 कर्णधार वानिंदू हसरंगा याला आयसीसीने पुढील दोन सामन्यांसाठी निलंबित केले आहे. हसरंगलाला 5 डिमेरिट गुण मिळाले आहेत. जर एखाद्या खेळाडूला 24 महिन्यांत पाच डिमेरिट गुण मिळाले तर त्याला दोन टर्मसाठी निलंबित केले जाईल. आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान खेळाडूला पाठिंबा दिल्याबद्दल खेळाडू, पंच किंवा रेफ्री यांच्या वैयक्तिक गैरवर्तनाशी संबंधित, ICC आचारसंहितेच्या कलम 2.13 चे उल्लंघन केल्याबद्दल हसरंगा दोषी आढळला.