मुंबई : आयसीसी  टी 20 वर्ल्ड कप 2021 चा अंतिम सामना  (ICC T 20 World Cup Final 2021)  रविवारी 14 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (Australia vs New Zealand) भिडणार आहेत. क्रिकेट विश्वाला या वेळेस नवा वर्ल्ड कप विजेता संघ मिळणार आहे. या हाय व्होलटेज सामन्याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज स्पिनर शेन वॉर्नने (Shane Warne) हा वर्ल्ड कप कोण जिंकणार, याबाबत भविष्यवाणी केली आहे. वॉर्नने एक व्हीडिओ ट्विट केला आहे. (icc t 20 world cup  2021 final new zealand vs australia former spinner shane warne prediction about who win trophy)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वॉर्नने काय म्हंटलंय?


"ही स्पर्धा आतापर्यंत धमाकेदार राहिली आहे. दोन्ही सेमी फायनल सामने रंगतदार झाले. इंग्लंड आणि पाकिस्तान उपांत्य फेरीतील सामन्यात चांगले खेळले. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात धडक मारली. त्यासाठी दोघांचं अभिनंदन. सेमी फायनलमध्ये पाकिस्तानवर अफलातून विजय मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडे जातो, ऑस्ट्रेलिया पहिला वहिला टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याच्या दिशेने जातेय. ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला आहे, त्याला तोड नाही", असं वॉर्न त्याने शेअर केलेल्या व्हीडिओत म्हणाला आहे.


स्टीव्ह स्मिथबाबत काय म्हणाला?


वॉर्नने स्टीव्ह स्मिथच्या स्थानाबाबतही प्रतिक्रिया दिली. वॉर्नने स्वीकार केला की स्टीव्हला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देणार नाही. यानंतरही वॉर्नने मान्य केलं की, ऑस्ट्रेलियाच्या खराब सुरुवातीनंतरही स्टीव्हची गरज भासते.