T20 World Cup | अफगाणिस्तान विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्याआधी झहीर खानचा विराटला महत्त्वाचा सल्ला
अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज `श्रीरामपूर एक्सप्रेस` झहीर खानने विराटसेनेला मोलाचा आणि तितकाच महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
यूएई : आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमधील ग्रृप 2 मधील आज महत्त्वाचा सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने भिडणार आहेत. या सामन्याआधी टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज 'श्रीरामपूर एक्सप्रेस' झहीर खानने विराटसेनेला मोलाचा आणि तितकाच महत्त्वाचा सल्ला दिला आहे. झहीरने हा सल्ला बॉलिंग लाईनअपबाबत दिला आहे. या महत्त्वाच्या सामन्यात झहीर बॉलिंगमध्ये बदल करण्याच्या विरोधात आहेत. तसेच झहीरने भारतीय गोलंदाजांचं कौचुक केलं आहे. गोलंदाजांना त्यांची भूमिका चोखपणे पार पाडण्यासाठी फलंदाजांनी सन्मानजनक धावसंख्या उभारली नाही. त्यामुळे पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी गोलंदाजांना दोषी ठरवू शकत नसल्याचं मत झहीरने व्यक्त केलं. (icc t 20 world cup 2021 former team india bolwer zaheer khan give advice to virat kohli before afghanistan match)
झहीर काय म्हणाला?
"मला नाही वाटत की बॉलिंग लाईनअपमध्ये काही बदल करायला हवा. कारण अद्याप गोलंदाजांना त्यांची भूमिका चोखपणे पार पाडण्यासाठी योग्य संधीच मिळाली नाहीये. जर फलंदाजांनी सन्मानजनक धावसंख्या उभारली असती आणि गोलंदाज अपयशी ठरले असते, तर गोष्ट समजण्यासारखी होती. मात्र तसं काही घडलेलं नाही. तुम्ही योग्य धावा केल्या नाहीत, त्यामुळे तुम्ही दोन्ही सामने गमावलेत. मला नाही वाटत यावर काही चर्चा व्हायला हवी. बहुतांश मुद्दे हे कामगिरीवर आधारित आहेत की अद्याप या स्पर्धेत आम्ही अपेक्षित फलंदाजी पाहिली नाही", असं झहीर म्हणाला. तो क्रिकबझसोबत बोलत होता.
अफगाणिस्तान विरुद्ध आमनासामना
दरम्यान टीम इंडियाने पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध सलग 2 सामने गमावले. त्यामुळे अफगाणिस्तान विरुद्घचा सामना हा टीम इंडियासाठी सेमी फायनलच्या जर तरच्या समीकरणाच्या दृष्टीने निर्णायक आहे. यामुळे या सामन्यात टीम इंडियाच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.