IND vs NZ | `टॉसपूर्वीच न्यूझीलंड टीम इंडियावर वरचढ होती`
टी 20 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडने (New Zealand) टीम इंडियाचा (Team India) 8 विकेट्सने पराभव केला.
मुंबई : टी 20 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडने (New Zealand) टीम इंडियाचा (Team India) 8 विकेट्सने पराभव केला. या सलग दुसऱ्या पराभवासह टीम इंडियाच्या सेमी फायनलच्या आशा जवळपास धुसर झाल्या आहेत. टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात बॅटिंग आणि बॉलिंगनेही निराशाजनक कामगिरी केली. सामन्याच्या सुरुवातीपासून न्यूझीलंड वरचढ होती. या सामन्याच्या निकालानंतर दिग्गज खेळाडू प्रतिक्रिया देत आहेत. टीम इंडियाचा माजी उपकर्णधार अजय जाडेजाने टीम इंडियाच्या पराभवावर निराशा व्यक्त केली आहे. सामना सुरु होण्याआधीपासून न्यूझीलंड टीम इंडियावर वरचढ असल्याचं अजय जाडेजा म्हणाला. (icc t 20 world cup 2021 india vs newzealand former indian crickter ajay jadeja unhappy)
अजय जाडेजा काय म्हणाला?
"न्यूझीलंड टॉस होण्याआधीपासून टीम इंडियावर वरचढ होती. टीम मॅनेजमेंटने घाईगडबडीत आणि दबावात टीम इंडियाची निवड केली. त्यानंतर पुढे टॉस हरलो, जे की कोणाच्याही हातात नसतं. त्यानंतर सलामीवीर बॅटिंगसाठी मैदानात आले. टीम इंडियाची बॅटिंग संपल्यानंतर सामन्यात काहीच मजा राहिली नव्हती. उरल्या सुरल्या अपेक्षा होत्या, त्याही पहिल्या 6 ओव्हरनंतर संपल्या", असं अजय जाडेजा म्हणाला. तो क्रिकबझसोबत बोलत होता.
काहीही फरक पडत नाही : सेहवाग
"टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनेही सामन्याच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. याबाबत माझ्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही. हार्दिक पंड्याने बॉलिंग केली, इतकंच काय ते सकारात्मक होतं. पंड्याने उरलेल्या 3 सामन्यात बॉलिंग करो किंवा न करो, खेळो अथवा न खेळो, काहीही फरक पडत नाही", अशा शब्दात सेहवागने आपली नाराजी व्यक्त केली.
या सामन्यात ओपनिंग कॉम्बिनेशनमध्ये बदल करण्याचा प्रयोग करण्यात आला जो की चांगलाच फसला. या वरुन सेहवानगे काही प्रश्न उपस्थित केले. "जेव्हा एखादा सलामीवीर चांगली कामगिरी करतो, तेव्हा त्यात बदल करायची काय गरज आहे", असा सवाल सेहवागने उपस्थित केला.
"ग्रेग चॅपलने 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये सचिन तेंडुलकर सलामीला चांगला खेळत होता. त्यानंतरही त्याला चौथ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी पाठवण्यात आलं. आता तुम्ही ज्या गोष्टी योग्य पद्धतीने सुरु आहेत, त्यात बदल केलात तर परिणाम विपरित येणारच", अशी प्रतिक्रिया सेहवागने दिली.