ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडपैकी ही टीम जिंकणार टी 20 वर्ल्ड कप, सुनील गावसकरांची भविष्यवाणी
लिटील मास्टर सुनील गावसकर (Sunil Gavskar) यांन टी 20 वर्ल्ड कप (Icc t 20 world 2021) कोण जिंकणार याबाबत भविष्यवाणी केली आहे.
मुंबई ृ: आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2021 च्या (Icc t 20 world 2021) अंतिम सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड (Australia vs New zealand) यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. न्यूझीलंड पहिल्यांदा तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदाच टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पोहचले आहेत. त्यामुळे क्रिकेट विश्वाला नवा विश्व विजेता मिळणार आहे. तसेच वर्ल्ड कप जिंकण्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार तयारी केली आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. त्यामुळे सामना कोण जिंकणार, याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलंय. (icc t 20 world cup 2021 New Zeland vs Australia Littile Master Sunil Gavskar Prediction about who will win trophy)
टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि लिटील मास्टर असलेले सुनील गावसकर यांनी या महामुकाबल्याबाबत भविष्यवाणी केली आहे. कोणती टीम टी 20 वर्ल्ड कप जिंकणार, त्या टीमचं नाव गावसकर यांनी सांगितलं आहे.
गावसकर काय म्हणाले?
"ऑस्ट्रेलिया टी 20 वर्ल्ड कप जिंकेल. टी 20 क्रिकेट या झटपट फॉर्मेटमध्ये ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडवर वरचढ राहिली आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड टी 20 सामन्यात 14 वेळा आमनेसामने भिडले आहेत. ऑस्ट्रेलियाने 14 पैकी 9 सामन्यात विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडने 4 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केलाय. तर 1 सामना हा टाय राहिला आहे. ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी ही 64.28 इतकी आहे.
"न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये टी 20 वर्ल्ड कपची प्रबळ विजेता समजल्या जाणाऱ्या इंग्लंडचा पराभव केला. तर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर मात करत अंतिम सामन्यात धडक मारली", असं गावसकर म्हणाले. गावसकर स्पोर्ट्स टुडेसोबत बोलत होते. यावेळेस त्यांनी ही भविष्यवाणी केली.