T 20 World Cup Final, NZ vs AUS | न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने, कोण होणार विश्वविजेता?
टी 20 वर्ल्ड कप 2021 च्या अंतिम सामन्यात (Icc t 20 world cup Final 2021) ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (New zealand vs Australia) आमनेसामने भिडणार आहेत.
यूएई : क्रिकेट विश्वासाठी आजचा दिवस (14 नोव्हेंबर) महत्त्वाचा आहे. टी 20 वर्ल्ड कप 2021 (T 20 world cup Final 2021) च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (New zealand vs Australia) आमनेसामने भिडणार आहेत. दोन्ही संघांनी पहिल्यांदाच टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात धडक दिली आहे. त्यामुळे दोन्ही संघांना विश्व विजेता होण्याची संधी आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वाला नवा विश्व विजेता मिळणार आहे. (Icc t 20 world cup Final 2021 New zealand vs Australia Head To head Records)
न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी ही केन विल्यमसनच्या खांद्यावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व एरॉन फिंच करणार आहे. हा सामना जिंकून वर्ल्ड कप कोण जिंकणार याकडे क्रिकेटविश्वाचं लक्ष असणार आहे. दरम्यान या दोन्ही संघांची टी 20 मधील कामगिरी कशी राहिली आहे, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
आकडेवारी कोणाच्या बाजूने?
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड टी 20 मध्ये एकूण 14 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा राहिला आहे. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर 9 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडला 4 सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर 1 सामना हा टाय राहिला आहे.
वर्ल्ड कप विजेता कोण ठरणार, या प्रश्न सर्वच क्रिकेट चाहते विचारत आहेत. या प्रश्नाचं उत्तर हे 40 वर्षांपूर्वीच्या इतिहासातून मिळेल. आयसीसीच्या स्पर्धेत या दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध 4 मॅचेस खेळल्या आहेत.
न्यूझीलंडने 1981 नंतर ऑस्ट्रेलियाचा बाद फेरीत (Knock Out Round) पराभव केलेला नाही. म्हणजेच आयसीसीच्या स्पर्धेत न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियावर अखेरचा विजय हा 40 वर्षांआधी मिळवला होता. न्यूझीलंडने सिडनीत 1981 मध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर 78 धावांनी मात केली होती.
हे उभयसंघ आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत 5 व्यांदा आमनेसामने असणार आहेत. या आधी झालेल्या 4 ही सामन्यांमध्ये कांगारुंनी किवींचा पराभव केला आहे. त्यामुळे या सामन्यात जिंकून पराभवाच्या मालिकेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न न्यूझीलंडचा असेल.
दोन्ही संघांची दुबईतील आकडेवारी
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दुबईत पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. याआधी ऑस्ट्रेलियाने दुबईत 11 सामने खेळले आहेत. यापैकी प्रत्येकी 5 सामन्यात विजय आणि पराभव झाला आहे. तर न्यूझीलंडने 8 मॅच खेळले आहेत. यापैकी 3 वेळा किवींचा विजय झाला आहे. तर 5 मॅचेसमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
न्यूझीलंडला अद्वितीय कामगिरीची संधी
न्यूझीलंडला अद्वितीय कामगिरीची करण्याची संधी आहे. न्यूझीलंडने अंतिम सामना जिंकला तर एकाच वर्षात आयसीसीचे दोन्ही स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारा पहिली टीम ठरेल. तर दुसऱ्या टी 20 फायनलमध्ये खेळणाऱ्या कांगारुही विजेतपद मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे विश्व विजेता कोण ठरणार याकडे क्रीडा विश्वाचं लक्ष असणार आहे.