T20 WORLD CUP | मार्टिन गुप्टिलची ऐतिहासिक कामगिरी, विराट कोहलीच्या पंगतीत स्थान
न्यूझीलंडकडून (New Zealand) सलामीवीर मार्टिन गुप्टीलने (Martin Guptill) 56 चेंडूत 93 धावांची वादळी खेळी केली. यामध्ये त्याने 7 सिक्स आणि 6 फोर लगावले.
यूएई : आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमधील 32 वा सामना न्यूझीलंड विरुद्ध स्कॉटलंड यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात स्कॉटलंडने टॉस जिंकून न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडले. न्यूझीलंडने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 172 धावा केल्या. न्यूझीलंडकडून सलामीवीर मार्टिन गुप्टीलने 56 चेंडूत 93 धावांची वादळी खेळी केली. यामध्ये त्याने 7 सिक्स आणि 6 फोर लगावले. या खेळीत त्याने 24 धावा पूर्ण करताच ऐतिहासिक कामगिरी केली. 24 वी धाव पूर्ण करताच गुप्टीलच्या टी 20 क्रिकेटमध्ये 3 हजार धावा पूर्ण झाल्या. यासह गुप्टील टी 20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीनंतर 3 हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा दुसराच फलंदाज ठरला. (icc t 20 world cup New Zealand vs Scotland martin guptill become 2nd batsman who completd 3 thousands runs in t 20 cricket after virat kohli)
गुप्टीन टी 20 कारकिर्दीतील 101 व्या डावात सिक्स खेचत हा किर्तीमान रचला. तर विराटने अवघ्या 81 डावांमध्ये 3 हजार धावा पूर्ण केल्या. गुप्टीलच्या नावे टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्सचा ठोकण्याचा विक्रम आहे. गुप्टीलने आतापर्यंत टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 148 सिक्स खेचले आहेत.
टी 20मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटच्या नावे 92 सामन्यात 3 हजार 225 धावा आहेत. विराटनंतर मार्टिन गुप्टीलचा दुसरा नंबर आहे. तिसऱ्या नंबरवर 'हिटमॅन' रोहित शर्मा आहे. रोहितने 113 सामन्यांमध्ये 2 हजार 878 रन्स केल्या आहेत. आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग 2 हजार 570 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचच्या नावे 2 हजार 554 रन्स आहेत. तो पाचव्या स्थानी विराजमान आहे.
टी 20 मधील सिक्सर किंग
या सामन्यात गुप्टीलने तिसरा सिक्स खेचत पराक्रम केला. मार्टिनने तिसऱ्या सिक्ससह टी 20 क्रिकेटमध्ये 150 सिक्स लगावण्याचा विक्रम आपल्या नावे केला. मार्टिन टी 20 मध्ये 150 सिक्सचा टप्पा ओलांडणारा पहिला फलंदाज ठरला. सर्वाधिक सिक्सच्या बाबतीत टीम इंडियाचा रोहित शर्मा 134 सिक्ससह दुसऱ्या स्थानी आहे.