मुंबई : पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपसाठीच्या टीम निश्चित झाल्या आहेत. १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत ऑस्ट्रेलियात टी-२० वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत १६ टीम सहभागी होणार आहेत. यातल्या १० टीमना थेट प्रवेश मिळाला आहे, तर उरलेल्या ६ टीमनी क्वालिफायिंग स्पर्धा खेळून वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळवलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीने टी-२० वर्ल्ड कपचं वेळापत्रक आधीच जाहीर केलं असलं तरी उरलेल्या ६ टीम मात्र ठरलेल्या नव्हत्या. टी-२० वर्ल्ड कपच्या सुपर-१२ ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान या ८ टीमना थेट प्रवेश मिळाला आहे. तर ८ टीमपैकी ४ टीम सुपर-१२मध्ये स्थान मिळवतील.


आयसीसी टी-२० वर्ल्ड कप क्वालिफायिंग स्पर्धेत नेदरलँडचा विजय झाला. फायनलमध्ये नेदरलँडने पपुआ न्यूगिनीचा पराभव केला. पण या दोन्ही टीम वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय झाल्या. या दोन टीमशिवाय ओमान, स्कॉटलंड, नामिबीया आणि आयर्लंडलाही टी-२० वर्ल्ड कपचं तिकीट मिळालं आहे.


श्रीलंका आणि बांगलादेश क्रमवारीत खालच्या स्थानावर असल्यामुळे त्यांना वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश मिळणार नाही. या दोन्ही टीमना ग्रुप स्टेजच्या मॅच खेळाव्या लागणार आहेत.


टी-२० वर्ल्ड कप पहिला राऊंड


ग्रुप ए- श्रीलंका, पपुआ न्यूगिनी, ओमान, आयर्लंडल


ग्रुप बी : बांगलादेश, नेदरलँड, नामिबीया, स्कॉटलंड


या दोन्ही ग्रुपमधल्या सर्वाधिक पॉईंट मिळवणाऱ्या प्रत्येकी २-२ टीम सुपर-१२ मध्ये प्रवेश मिळवतील.


सुपर-१२ ग्रुप 


ग्रुप १- ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, ग्रुप ए विजेता आणि ग्रुप बीमधली दुसरी टीम 


ग्रुप २- भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, ग्रुप बी विजेता, ग्रुप ए मधली दुसरी टीम 


भारताच्या मॅच 


२४ ऑक्टोबर : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पर्थ 


२९ ऑक्टोबर : भारत विरुद्ध क्वालिफायर ए, मेलबर्न


१ नोव्हेंबर : भारत विरुद्ध इंग्लंड, मेलबर्न


५ नोव्हेंबर : भारत विरुद्ध क्वालिफायर बी, ऍडलेड 


८ नोव्हेंबर : भारत विरुद्ध अफगाणिस्तान, सिडनी 


११ नोव्हेंबर : सेमी फायनल, सिडनी 


१२ नोव्हेंबर : सेमी फायनल, ऍडलेड


१५ नोव्हेंबर : फायनल, मेलबर्न