PAK vs AUS, 2nd Semi-Final: ऑस्ट्रेलिया `टॉस का बॉस`, न्यूझीलंड विरुद्ध कोण लढणार?
PAK vs AUS, 2nd Semi-Final: ऑस्ट्रेलिया `टॉस का बॉस`, सामना कोण जिंकणार
दुबई: टी 20 वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलचा पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना होत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने टॉस जिंकला आहे. पहिल्यादा या संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. तर पाकिस्तान संघाला फलंदाजी करावी लागणार आहे. दुबईत होणाऱ्या या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. A टीममधून ऑस्ट्रेलिया संघ तर B टीममधून सर्व सामने जिंकलेला पाकिस्तान संघ असा सामना होत आहे.
सेमीफायनलआधी पाकिस्तानचे दोन धडाकेबाज फलंदाज आजारी असल्याने संघाची चिंता वाढली आहे. शोएब मलिक आणि रिझवान या दोघांची कोरोना चाचणी देखील करण्यात आली. ही चाचणी निगेटीव्ह आली आहे. दोन्ही खेळाडू लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना चाहते आणि क्रिकेटप्रेमी करत आहे.
पाकिस्तान संघ जरी आता टी 20 वर्ल्ड कपमध्ये यंदा चांगलं खेळला असला, तरी आतापर्यंत ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यात त्यांची कामगिरी अत्यंत खराब आहे. ऑस्ट्रेलिया संघासमोर पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले आहेत. 1987, 1999 असो किंवा 2010 ऑस्ट्रेलियाचं पारडं कायम जड राहिलं आहे. त्यामुळे आता ही टीम ऑस्ट्रेलियाला पराभूत करून आपल्या आधीच्या पराभवाचा बदला घेणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पाकिस्तान संघ प्लेइंग इलेव्हन
मोहम्मद रिझवान, बाबर आझम, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, हरिस रौफ आणि शाहीन आफ्रिदी.
ऑस्ट्रेलिया संघ प्लेइंग इलेव्हन
डेव्हिड वॉर्नर, एरॉन फिंच, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा आणि जोश हेझलवूड.