मुंबई : T20 World Cup:  क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा एकदा वादळ पाहायला मिळाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) T20 World Cupचे वेळापत्रक जाहीर केले आहे.  हा  World Cup ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर- नोव्हेंबर या दोन महिन्यांमध्ये होणार आहे. भारत आणि पाकिस्तानची लढतीकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 T20 World Cup मध्ये भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान हे संघ असणार आहेत. तसेच श्रीलंका, नामिबिया, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड हे चार संघ 16 ऑक्टोबरपासून पात्र ठरण्यासाठी खेळणार आहेत. यामधून निवडलेल्या दोन संघांना सुपर 12 मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे एकूण 10 टीममध्ये हा World Cup होणार आहे.


टीम इंडिया World Cupमधील अभियानाला 23 ऑक्टोबरपासून सुरुवात करेल. पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर होणार आहे. मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान 23 ऑक्टोबरला एकमेकांना भिडतील. याआधी टी 20 विश्वचषकात भारत  आणि पाकिस्तान  2021मध्ये भिडले होते. त्या सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियाला पराभूत केले होते. 


  World Cupमधील टीम इंडियाचे सामने


-    भारत विरुद्ध पाकिस्तान, 23 ऑक्टोबर 2022 (मेलबर्न)
-    भारत विरुद्ध ग्रुप ए रनर-अप, 27 ऑक्टोबर  2022 (सिडनी)
-    भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका, 30 ऑक्टोबर  2022 (पर्थ)
-    भारत विरुद्ध बांग्लादेश, 2 नोव्हेंबर   2022 (अ‍ॅडलेड)
-    भारत विरुद्ध ग्रुप बी विजेता, 6 नोव्हेंबर   2022 (मेलबर्न)



टीम इंडियाला पाकिस्तान, बांग्लादेश, दक्षिण आफ्रिका आणि अन्य दोन क्वालिफायर टीमसह  ग्रुप-2 मध्ये ठेवले आहे. त्यानुसार ग्रुप- एक: इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान आणि अन्य दोन क्वालिफायर  आणि ग्रुप- दोन : भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश आणि अन्य दोन क्वालिफायर असे सामने होतील.


 मेलबर्न येथे अंतिम सामना 


T20 विश्वचषकाचे सामने अ‍ॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी याठिकाणी तर उपांत्य सामने 9 आणि 10 नोव्हेंबरला होणार आहेत. World Cupचा अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न येथे होणार आहे.