T20 World Cup 2022: क्रिकेटचा महाकुंभ टी20 वर्ल्ड कपला येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलियात (Australia) होणाऱ्या या स्पर्धेत तब्बल 16 संघ सहभागी झाले आहेत. वेस्ट इंडिजने आतापर्यंत सर्वाधिक 2 वेळा टी20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं आहे. तर भारत, पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी एक वेळा जेतेपद पटकावलं आहे. आता यंदा वर्ल्ड कप स्पर्धेचा चॅम्पियन कोण ठरणार याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीने निवडले 5 सर्वश्रेष्ठ खेळाडू
टी20 वर्ल्ड कप  (T20 Word Cup) स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने (ICC) टी20 दमदार कामगिरी करु शकतील अशा 5 खेळाडूंची निवड केली आहे. यात भारताच्या एका स्टार प्लेअरचा समावेश करण्यात आला आहे. आयसीसीने ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner), श्रीलंकेचा ऑलराऊंडर हसारंगा (Wanindu Hasaranga), इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) आणि पाकिस्तानचा ओपनर मोहम्मद रिझावन (Mohammad Rizwan) यांची निवड केली आहे. तर भारतातर्फे विराट (Virat Kohli) आणि रोहितऐवजी (Rohit Sharma) चक्क धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) आयसीसीने पसंती दिली आहे.


सूर्यकुमार यादवचा धडाका
सूर्यकुमार यादवने यावर्षी टी20मध्ये दमदार कामगिरी केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचा (Team India) सूर्यकुमार यादव प्रमुख खेळाडू आहे. असं असलं तरी सूर्यासाठी गेल्या वर्षी युएईमध्ये झालेली टी20 वर्ल्ड कप स्पर्धी फारसा चांगली ठरली नाही. चार सामन्यात सूर्याला केवळ 42 धावा करता आल्या होत्या. पण यावर्षी सूर्या तळपतोय. आयसीसी टी20 क्रमवारीतही सूर्याने थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. 


भारताकडून सर्वाधिक रन्स करणारा फलंदाज
सूर्यकुमार यादवने यावर्षी 180.29 च्या स्ट्राईक रेटने तब्बल 732 धावा केल्या आहेत. सूर्याने शिखर धवनला (Shikhar Dhawan) मागे टाकलं आहे. यंदाच्या वर्षात तो भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.