T20 World Cup 2022: सचिनची भविष्यवाणी; टी20 वर्ल्ड कपच्या Semi Final मध्ये असणार `हे` 4 संघ
T20 World Cup 2022 : सचिननं थेट या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यांपर्यंत मजल मारत तिथपर्यंतचा पल्ला कोण गाठणार याबाबत वक्तव्य केलं आहे. कोण करणार चांगली कामगिरी?
Team India in T20 World Cup 2022: भारतीय क्रिकेट संघ सध्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर 12 फेरीआधी सराव सामन्यांमध्ये घाम गाळताना दिसत आहे. या वर्षीच्या वर्ल्ड कपमध्ये संघ पाकिस्तानविरोधातील सामन्यानं आपल्या कामगिरीची सुरुवात करताना दिसणार आहे. एकिकडे Team India च्या कामगिरीकडे क्रिकेटप्रेमी आणि क्रिडाविश्वाच्या नजरा असतानाच दुसरीकडे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं (Sachin tendulkar) सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. सचिननं थेट या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यांपर्यंत मजल मारत तिथपर्यंतचा पल्ला कोण गाठणार याबाबत वक्तव्य केलं आहे. (icc t20 world cup sachin tendulkars big prediction names his four semifinalists of the tournament)
भारतीय संघाबाबत काय म्हणाला?
भारत (India) आणि पाकिस्तानमध्ये (ind vs pak) खेळवल्या सामन्याबाबतही सचिननं त्याचं मत मांडलं. या दोन्ही संघांमधील सामन्याविषयी एका मुलाखतीत तो म्हणाला, 'भारतीय क्रिकेट संघ माझ्या आवडीचा. निर्विवादपणे माझं मन याच संघासोबत आहे. मला कायम वाटतं की, भारताचा संघ जिंकावा. हे फक्त अशासाठीच नाही की मी एक भारतीय आहे. पण, मला विश्वास आहे की आमच्यामध्ये या परिस्थितीतही चांगल्या खेळाचं प्रदर्शन करण्याची क्षमता आहे.'
अधिक वाचा : ऑस्ट्रेलिया T20 World Cup जिंकणार! 'या' खेळाडूमुळे पलटणार डाव
उपांत्य फेरीत कोणते संघ?
भारताच्याच खात्यात T20 World Cup चं जेतेपद यावं यासाठी सचिन आग्रही असला तरीही तो या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये इतरही देशांच्या संघांना पाहतो. पाकिस्तान (Pakistan), ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड (England) हे संघ वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारतील, असं तो म्हणाला. इतकंच नव्हे, तर दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि न्यूझीलंड (new zealand) हे संघसुद्धा स्पर्धेत चांगली कामगिरी करतील अशी भविष्यवाणीच त्यानं केली.
अधिक वाचा : T20 World Cup नंतर पुन्हा कधीच नाही खेळणार...; 'या' 3 खेळाडूंनी वाढवली संघाची चिंता
असं असतानाही त्याचा संपूर्ण कल मात्र भारतीय संघाकडेच दिसून आला. गेल्या काही दिवसांमध्ये संघाची कामगिरी आणि एकंदर परिस्थिती पाहता योग्य आखणी केल्यास Team दमदार प्रदर्शन करेल, अशा आशा त्यानं व्यक्त केल्या. तेव्हा आता खुद्द क्रिकेटचा देवच आशावादी असल्यामुळं भारतीय संघाची जबाबदारी वाढलीये असं म्हणणं वावगं ठरणार नाही.