Champions Trophy 2025 : 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (Champions Trophy) संदर्भात सध्या मोठ्या घडामोडी समोर येत आहेत. पाकिस्तानात आयोजित करण्यात येणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत सरकारने भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला आहे.  त्यामुळे आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला हाइब्रिड मॉडलने ही स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला, पण पाकिस्तान याला नकार देत आहे. हाइब्रिड मॉडलने चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित केल्यास काही सामने हे न्यूट्रल वेन्यूवर होऊ शकतात. यामुळे भारताला त्यांचे सामने पाकिस्तान सोडून इतर देशातील मैदानावर खेळता येतील. पण  पाकिस्तान या  हाइब्रिड मॉडलला स्वीकारत नाहीये, त्यामुळे स्पर्धेला अवघे काही महिने शिल्लक असल्याने आयसीसी आता मोठी ऍक्शन घेण्याच्या तयारीत आहे. 


72 तासांनी होणार निर्णय : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फेब्रुवारी 19 ते 9 मार्च दरम्यान होणार आहे. यासाठी आयसीसी 29 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बोर्ड बैठकीत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी हाइब्रिड मॉडलद्वारे खेळण्यास सज्ज आहे.  हाइब्रिड मॉडलद्वारे चॅम्पियन्स ट्रॉफीचे 10 सामने पाकिस्तानमध्ये तर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसह उर्वरित 5 सामने तटस्थ ठिकाणी आयोजित केले जातील. यामुळे पुढील 72 तास पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. 29  नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आयोजनाबाबत आयसीसी निर्णय घेईल. पीसीबीचा हाइब्रिड मॉडलला असणारा नकार होकारात बदलण्यासाठी आयसीसी  सेमीफायनल आणि फायनल पाकिस्तानमध्येच आयोजित करण्याच्या तयारीत आहे. परंतु जर भारताला उपांत्य किंवा अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही तरच हे शक्य होईल. आयसीसीची ही योजना भारत आणि पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीवरून असणारा तणाव कमी करू शकते, परंतु यामुळे लॉजिस्टिक आव्हाने वाढतील. अशा परिस्थितीत आयसीसी पीसीबीला काही सवलत देईल अशी शक्यता आहे. 


हेही वाचा : 'मी माझ्या गर्लफ्रेंडला...', विराटचं ऐकून शास्त्रींनी फोन केला अन्...; BCCI ने मोडला नियम! स्वत: सांगितला किस्सा


 


पाकिस्तान तयार झालं नाही तर काय? 


पाकिस्तान जर हायब्रीड मॉडेलला तयार झालं नाही तर आयसीसी पाकिस्तानकडून चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमान पद काढून घेण्याची शक्यता आहे. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनासंदर्भात दक्षिण अफ्रीका आणि अमीरात क्रिकेट बोर्ड यांच्याशी सुद्धा चर्चा केलेली आहे अशी माहिती मिळतेय. आयसीसीने आधीच पीसीबीला स्पष्ट केले आहे की, भारताशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन होऊ शकत नाही, कारण त्यामुळे आयसीसीचे नुकसान होणार आहे. भारताला स्पर्धेतून काढून टाकल्यास पाकिस्तानचेही मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. पाकिस्तानची प्रतिमा तसेच कोट्यवधी डॉलर्स पणाला लागल्याने परस्पर तडजोड हाच याबाबत एकमेव उपाय ठरू शकतो.